The King Is Back कोहलीची पाकिस्तानविरुद्ध 'विराट' इनिंग
मुंबई, 23 ऑक्टोबर : दिवाळीच्या एक दिवस आधी T20 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याने कोट्यवधी भारतीयांची दिवाळी साजरी झाली. संपूर्ण सामन्यात भारतीय चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली होती. भारताच्या लागोपाठ विकेट पडल्याने संघ अडचणीत आला होता. मात्र, माजी कर्णधार विराट कोहलीच्या खेळीने संघाला संकटातून बाहेर काढत सामना जिंकून दिला. भारत-पाकिस्तानच्या या हायव्होल्टेज सामन्याने संपूर्ण भारताचा श्वास क्षणभर थांबवला होता.
सामन्याच्या शेवटच्या षटकात पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज खूप दडपणाखाली दिसला. मात्र, यादरम्यान त्याने हार्दीक पांड्याला बाद करत सामना रोमांचक वळणावर आणला. पण पुढच्याच चेंडूवर त्याने वाइड थ्रो केला, त्यामुळे भारत-पाकिस्तानची धावसंख्या बरोबरीत आली. कार्तिक फलंदाजीला आल्यानंतर आर. अश्विनने क्षेत्ररक्षकावर चेंडू मारून भारताला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. चाहत्यांनी सोशल मीडियावर भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात तुफान ट्विट आणि मीम्स शेअर केले. सोशल मीडियावर कोणीतरी विराट कोहलीच्या खेळीनंतर द किंग इज बॅक म्हटले आहे, तर कोणी त्याला GOAT (सर्वकालीन महान) म्हटले आहे.