JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / सूर्यकुमार यादवनं स्वत:लाच दिलं आलिशान गिफ्ट, किंमत कोटींच्या घरात

सूर्यकुमार यादवनं स्वत:लाच दिलं आलिशान गिफ्ट, किंमत कोटींच्या घरात

Suryakumar Yadav: सेंट किट्सच्या मैदानात चौफेर फटकेबाजी केल्यानंतर सूर्यकुमारनं इन्स्टाग्रामवर स्टेटसला एक खास व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत एक आलिशान कार दिसतेय. त्याखाली त्यानं ‘रेडी फॉर डिलिव्हरी’ असं कॅप्शनही दिलंय.

जाहिरात

सूर्यकुमार यादवनं स्वत:लाच दिलं आलिशान गिफ्ट, किंमत कोटींच्या घरात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सेंट किट्स, 03 ऑगस्ट : कॅरेबियन बेटांवर सध्या सूर्यकुमार यादवच्या बॅटनं चांगलच वादळ निर्माण केलंय. भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधल्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात सूर्यकुमारनं तडाखेबाज नाबाद अर्धशतक झळकावलं. त्याच्या याच खेळीच्या जोरावर टीम इंडियानं विंडीजवर 7 विकेट्सनी मात केली. या सामन्यात सूर्यकुमार ‘मॅन ऑफ द मॅच’चा मानकरीही ठरला. सेंट किट्सच्या मैदानात चौफेर फटकेबाजी केल्यानंतर सूर्यकुमारनं इन्स्टाग्रामवर स्टेटसला एक खास व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत एक आलिशान कार दिसतेय. त्याखाली त्यानं ‘रेडी फॉर डिलिव्हरी’ असं कॅप्शनही दिलंय. त्यामुळे ही महागडी कार त्यानं स्वत:ला गिफ्ट केल्याचं बोललं जातंय. महागड्या कारची किंमत काय**?** सूर्यकुमारनं आपल्या इन्स्टाग्रामवर ज्या कारचा व्हिडीओ शेअर केलाय ती आहे पोर्शे कन्व्हर्टेबल. ज्याची भारतातली किंमत एक कोटी 30 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. सूर्यकुमारच्या गॅरेजमध्ये आधीच अनेक महागड्या गाड्या आहेत. त्यात बीएमडब्ल्यू 5 सीरीज 530 डी स्पोर्टस, रेंज रोव्हर इवोक, ऑडी ए-6 सारख्या लक्झरी कारही आहेत. याशिवाय हार्ले डेव्हिडसन आणि सुझूकी हायाबुसारख्या अल्ट्रा लक्झरी बाईक्स देखील आहेत. या वर्षाच्या सुरुवातीलाच सूर्यकुमारनं भारतीय लष्करात वापरली जाणारी ‘जोंगा’ ही जीप खरेदी केली होती. त्याचाही फोटो त्यानं सोशल मीडियात शेअर केला होता. हेही वाचा: CWG2022: वेटलिफ्टर लवप्रीत सिंगनं उचललं विक्रमी वजन, भारताच्या खात्यात आणखी एक पदक टी20 क्रमवारीत सूर्याची झेप दरम्यान ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव हे नाणं खणखणीत वाजतंय. गेल्या काही सामन्यात त्यानं धावांचा रतीब घातलाय. त्यामुळे आयसीसी ट्वेन्टी ट्वेन्टी फलंदाजांच्या क्रमवारीत तो आता थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. या यादीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्या क्रमांकावर आहे. पण या दोघांमध्ये केवळ दोन रेटिंग पॉईंटचा फरक आहे. बाबरच्या खात्यात 818 तर सूर्यकुमारच्या खात्यात 816 रेटिंग पॉईंट जमा आहेत. सूर्याचं टी20 विश्वचषकाचं तिकीट पक्क या दमदार कामगिरीसह सूर्यकुमारचं आगामी ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया कप आणि ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचं तिकीट पक्क मानलं जात आहे. सलामीवीर आणि मधल्या फळीतील एक भरवशाचा फलंदाज म्हणून सध्या त्यानं भारतीय संघातलं आपलं स्थान मजबूत केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या