मुंबई, 8 मार्च : भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी शेन वॉर्नबाबत (Shane Warne Death) केलेल्या वक्तव्यावरून दिलगिरी व्यक्त केली आहे. 4 मार्चला शेन वॉर्नचं निधन झालं, यानंतर एका कार्यक्रमात गावसकर यांना शेन वॉर्नबाबत प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी गावसकर वॉर्न महान बॉलर नसल्याचं मत व्यक्त केलं होतं. गावसकरांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरून त्यांच्यावर टीका होत होती. अखेर गावसकरांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत या सगळ्या प्रकरणावर दिलगिरी व्यक्त केली आहे. ‘मागे वळून बघताना तसा प्रश्नच विचारायला नको होता आणि मीदेखील अशा प्रश्नांचं उत्तर द्यायला नको होतं. खेळाडूची तुलना आणि मुल्यमापन करण्याची ती योग्य वेळ नव्हती. शेन वॉर्न महान खेळाडूंपैकी एक होता. रॉडनी मार्शही सर्वोत्तम विकेट कीपरपैकी एक होते, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो,’ असं गावसकर म्हणाले. हॅट्रिक घेतली त्याच मैदानात वॉर्नवर अंत्यसंस्कार, पंतप्रधानही उपस्थित राहणार ‘टीव्हीवर मला वॉर्न महान खेळाडू होता का? असा प्रश्न विचारण्यात आला, या प्रश्नावर मी माझं प्रामाणिक मत मांडलं,’ अशी प्रतिक्रिया गावसकरांनी दिली.
काय म्हणाले होते गावसकर? भारतीय स्पिनर आणि मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) शेन वॉर्नपेक्षा चांगले होते, असं गावसकर इंडिया टुडेसोबत बोलताना म्हणाले होते. वॉर्नने टेस्ट क्रिकेटमध्ये 708 आणि वनडेमध्ये 293 विकेट घेतल्या होत्या, पण गावसकरांच्या मते वॉर्नपेक्षा मुरलीधरन चांगला स्पिनर होता. Diet करत होता शेन वॉर्न, वजन कमी करताना तुम्हीही घ्या ही काळजी! माझ्यासाठी भारतीय स्पिनर आणि मुथय्या मुरलीधरन वॉर्नपेक्षा चांगले बॉलर होते. कारण वॉर्नचं भारतातलं रेकॉर्ड बघा. भारतामधलं त्याचं रेकॉर्ड फारच सामान्य आहे. भारतामध्ये त्याला फार यश मिळालं नाही. भारतीय खेळाडू स्पिन बॉलिंग चांगली खेळतात, पण मुथय्या मुरलीधरनचं भारताविरुद्धचं रेकॉर्ड उत्कृष्ट आहे, त्यामुळे माझ्या मते मुरलीधरन हा वॉर्नपेक्षा चांगला बॉलर आहे,’ असं गावसकर म्हणाले होते.