JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / सिक्स मारला अन् अचानक खाली कोसळला राहुल त्रिपाठी, मॅच सोडून परतावं लागलं पव्हेलियनमध्ये; पाहा काय घडलं

सिक्स मारला अन् अचानक खाली कोसळला राहुल त्रिपाठी, मॅच सोडून परतावं लागलं पव्हेलियनमध्ये; पाहा काय घडलं

गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने(SRH) विजय मिळवला. पण या सामन्यात हैदराबादला एक मोठा धक्का बसला, फलंदाज राहुल त्रिपाठीला (Rahul Tripathi ) फलंदाजी करताना मैदान सोडावे लागले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 एप्रिल: आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या या सत्रातील सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध गुजरात टायटन्स (Gujarat Titans) मॅच सोमवारी (11 एप्रिल) झाली. या मॅचमध्ये हैदराबादने गुजरातवर 8 विकेट्स राखून विजय मिळवला. मात्र या विजयानंतर हैदराबादची (SRH) अवस्था काहीशी बिकट झाली आहे. कारण या मॅचदरम्यान टीममधील महत्त्वाचा खेळाडू राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi Injury) याला दुखापत झाली. ही दुखापत एवढी गंभीर होती, की राहुलला मॅच मध्येच सोडून पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. नेमकं काय घडलं? राहुल त्रिपाठी मैदानावर आल्यानंतर सुरुवातीला चांगल्या लयीत खेळत होता. मात्र 14 व्या ओव्हरमध्ये तेवातियाच्या बॉलवर सिक्स मारल्यानंतर अचानक तो जमिनीवर कोसळला. त्याला अतिशय वेदना होत आहेत (Rahul Tripathi fell on ground) हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं. राहुलची परिस्थिती पाहून तातडीने टीमचे फिजिओ मैदानावर आले, आणि राहुलला थेट पव्हेलियनमध्ये (Rahul Tripathi Injury video) नेण्यात आलं. यानंतर राहुलला रिटायर्ड हर्ट (Retired Hurt) घोषित करण्यात आलं. त्याने 11 बॉलमध्ये 17 धावा केल्या होत्या. यामध्ये एक फोर आणि एक सिक्स होता.

संबंधित बातम्या

आधी केली जबरदस्त फिल्डिंग याच मॅचमध्ये गुजरातची बॅटिंग सुरू असताना राहुलने जबरदस्त फिल्डिंग केली होती. गुजरात टायटन्समधील शुभमन गिलचा शानदार कॅच (Rahul Tripathi catch video) घेत त्याला आऊट करण्याची महत्त्वाची कामगिरी राहुलने पार पाडली होती. राहुलच्या या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Rahul Tripathi catch of Shubhman Gill) होतो आहे. गुजरातने हैदराबादला 163 धावांचं आव्हान दिलं होतं. राहुल महत्त्वाचा खेळाडू गुजरातने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा आऊट झाल्यानंतर राहुल मैदानात आला होता. मात्र, अवघ्या 11 बॉलनंतर त्याला रिटायर्ड हर्ट (Rahul Tripathi) व्हावं लागले. राहुल पुढील मॅच खेळणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, आयपीएलच्या या सीझनमधील (IPL 2022) राहुलची आतापर्यंतची कामगिरी पाहता तो मिडल ऑर्डरमधील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे तो पुन्हा मैदानावर येणं हैदराबादसाठी गरजेचं आहे. दरम्यान, आज (12 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू एकमेकांना भिडणार आहेत. मागच्या सत्रात अगदी खराब कामगिरी केलेली आरसीबी यंदाच्या आयपीएलमध्ये अगदी फॉर्मात दिसत आहे, तर मागच्या सत्रात दमदार टीम असलेली सीएसके यंदा भोपळाही फोडू शकली नाही. पॉईंट्स टेबलमध्ये (IPL Points table) आरसीबी तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर सीएसके अगदी शेवटी. त्यामुळे आजच्या सामन्यात बेंगळुरू आपला फॉर्म कायम ठेवते, की चेन्नई आपलं विजयाचं खातं उघडते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या