JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / टेबल टेनिस विश्वाला खूप मोठा धक्का, 18 वर्षांच्या भारतीय खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू!

टेबल टेनिस विश्वाला खूप मोठा धक्का, 18 वर्षांच्या भारतीय खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू!

टेबल टेनिस फेडरेशननं प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार ‘विरूद्ध बाजूनं येणाऱ्या 12 चाकी ट्रेलरची डिव्हायडरला धडक बसली. त्यामुळे तो ट्रेलर अनियंत्रित झाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 एप्रिल : भारतीय टेबल टेनिस विश्वाला (Table Tennis) मोठा धक्का बसला आहे. तामिळनाडूचा 18 वर्षांचा टेबल टेनिसपटू विश्व दिनदयालनचा (Vishwa Deendayalan) अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. गुवाहटीहून शिलाँगला जात असताना झालेल्या अपघातमध्ये विश्वचा मृत्यू झाल्याची माहिती टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियानं (TTFI) प्रसिद्ध केलेल्या पत्रकात देण्यात आली आहे. विश्व 83व्या नॅशनल अँड इंटर स्टेट टेबल चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी 3 सहकाऱ्यांसह शिलाँगला जात होता. या अपघातामध्ये त्याच्याबरोबर प्रवास करणारे रमेश संतोष कुमार, अविनाश प्रसन्नाजी श्रीनिनासन आणि किशोर कुमार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. टेबल टेनिस फेडरेशननं प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार ‘विरूद्ध बाजूनं येणाऱ्या 12 चाकी ट्रेलरची डिव्हायडरला धडक बसली. त्यामुळे तो ट्रेलर अनियंत्रित झाला. त्याची टॅक्सीला धडक बसली आणि तो दरीत पडला. या अपघातामध्ये टॅक्सी चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर विश्व आणि अन्य सहकाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथं डॉक्टरांनी विश्वचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं.’ 6, 6, 4, 6 राशिद खाननं बॉलनं नाही तर बॅटनं फिरवली मॅच, हेलिकॉप्टर शॉट्सनं केलं CSK ला पराभूत! VIDEO विश्व दिनदयालन भारताच्या टेबल टेनिस विश्वातील उगवता तारा होता. कमी वयामध्येच त्यानं अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या होत्या. विश्व 27 एप्रिलपासून ऑस्ट्रियातील लिंजमध्ये होणाऱ्या  डब्ल्यूटीटी यूथ कंटेंडर चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार होता. भारताचा दिग्गज टेबल टेनिस स्टार अंचत शरत कमालनंही विश्वच्या गुणवत्तेचं कौतुक केलं होतं.

संबंधित बातम्या

या दुर्घटनेमुळे भारतीय टेबल टेनीस विश्वावर शोककळा पसरली आहे. टेबल टेनिस फेडरेशन, आजी आणि माजी खेळाडूंसह केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनीही विश्वच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या