केप टाऊन, 04 जानेवारी: इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. पहिली कसोटी गमावल्यानंतर इंग्लंडला पहिल्या डावात मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु संघ आपली कामगिरी सुधारू शकला नाही आणि शुक्रवारी पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 262-9 धावा केल्या. मात्र या सामन्यात एक मजेशीर प्रकार घडला. इंग्लंडचा जलद गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड फलंदाजीसाठी आला. मात्र त्याची विकेट पाहून लोकांना हसू आवरता आले नाही. स्टुअर्ट ब्रॉड आठव्या क्रमांकावर 231 धावांवर ओली पोपसह साथ देण्यासाठी क्रीजवर आला. त्याने आपले खातेही उघडले, पण कागिसो रबाडाच्या शानदार चेंडूने तो बोल्ड झाला. त्याच्या धाडसीपणाच्या पद्धतीने सर्वांनाच हसू फुटले. रबाडाच्या यॉर्करवर ब्रॉडला मोठा शॉट मारायचा होता. मात्र शॉट मारण्यासाठी बॅट उचलताच पॅडमध्ये बॅट अडकली. मात्र बॅट खाली टेकवण्याआधीच ब्रॉड बोल्ड झाला. वाचा- पोट सुटलेल्या क्रिकेटपटूंचा कापणार पगार! क्रिकेट बोर्डानं काढला अजब फतवा वाचा- सलमान खान Bigg Boss सोडणार? सदस्यांच्या बेताल वागण्यामुळे चढला भाईजानचा पारा
वाचा- टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, न्यूझीलंड दौऱ्याआधी स्टार फलंदाजाला गंभीर दुखापत वाचा- दीड जीबी इंटरनेट डेटाही पुरत नसेल तर करा ‘हा’ रिचार्ज! इंग्लंडने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीस सुरुवात केली आणि इंग्लंडची सुरुवात खराब झाली. दक्षिण आफ्रिकेच्या हल्ल्याला तोंड देणारा एकमेव इंग्लिश फलंदाज ऑली पोप होता. पोप 56 धावांवर क्रीजवर आहे तर जेम्स अँडरसन 3 धावा करुन त्याला साथ देत आहे. आता या जोडीकडूनच इंग्लिश संघाचा डाव 300 च्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे. पोपशिवाय बेन स्टोक्सने सर्वाधिक 47 धावा केल्या. स्टोक्स व्यतिरिक्त जो डेलेने 38, कर्णधार जो रूटने 35 आणि डोम सिब्लीने 34 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज कॅगिसो रबाडा, वर्नॉन फिलँडर, एनिच नॉर्टजे आणि ड्वेन प्रेटोरियस यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.