Ishan Kishan
नवी दिल्ली, 15 एप्रिल: ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू आणि दिल्ली कॅपिटल्सचा सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन(Shane Watson) याने मुंबईनचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनवर (Ishan Kishan ) 15.25 कोटी खर्च करण्याच्या निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. द ग्रेड क्रिकेटरवर बोलाताना वॉटसनने इशानवर भाष्य केले आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians ) संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे, याचे मला अजिबात आश्चर्य वाटलेले नाही. कारण त्यांच्यासाठी मेगा लिलाव आश्चर्यकारक राहिला होता. इशानवर त्यांनी इतके पैसे (Ishan Kishan 15.25 Crore) खर्च करणे, हा त्यांचा निर्णय फसला (Mumbai Indians Playing Price For Ishan’s Decision) आहे. इशान नक्कीच एक प्रतिभाशाली आणि कुशल क्रिकेटपटू आहे. परंतु तुम्ही त्याच्यावर आपली पूर्ण रक्कम खर्च करण्याइतकाही तो पात्र नाही. असे मोठे वक्तव्य वॉटसनने इशानसंदर्भात केले आहे. हे ही वाचा- IPL 2022, मोठी बातमी : हार्दिक पांड्यानं दिलं दुखापतीबाबत अपडेट, म्हणाला.. मुंबई व्यतिरिक्त 4 वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विषयी बोलताना वॉटसनने त्यांच्यातील उणीव सांगितली आहे. सीएसकेतही यावेळी काही उणीव दिसून आल्या आहेत. विशेषकरून त्यांची वेगवान गोलंदाजी. गतवर्षी त्यांच्याकडे शार्दुल ठाकूर होता. दीपक चाहरही सध्या दुखापतग्रस्त झाला आहे. सीएसकेने त्याच्यावर मेगा लिलावात मोठे पैसे खर्च केले होते. परंतु तो या संपूर्ण हंगामात खेळू शकणार नाहीय, जो खूप मोठा मुद्दा आहे. त्यांच्याकडे जोश हेजलवुडसारखा परदेशी गोलंदाजही नाही. त्यामुळेच हा संघ यंदा संघर्ष करतो आहे. यंदाच्या आयपीएल पर्वात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स चांगले प्रदर्शन करण्यात अपयशी ठरत आहेत. चेन्नईने 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर मुंबईला अद्याप हंगामातील एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यांनी सुरुवातीचे सलग 5 सामने गमावले आहेत.