नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : भारताचा सलामीवीर रोहित शर्माने कसोटीतही त्याचा दबदबा निर्माण केला आहे. त्यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत 212 धावांची खेळी केली. हे त्याचं कसोटीतील पहिलंच द्विशतक आहे. रोहित शर्माच्या नावावर कसोटीत 5 शतकं आणि 1 द्विशतक जमा झाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत रोहितनं धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात शतक केलं. त्यानंतर तिसऱ्या कसोटीत षटाकारांचा विश्वविक्रम केला. त्याच्या रोहित शर्माच्या खेळीने भारतीय क्रिकेट संघातील दोन मित्रांची कसोटी कारकिर्द धोक्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आतापर्यंत त्यानं तीन शतकं केली आहेत. विशेष म्हणजे रोहितनं सलामीला उतरल्यानंतर जबरदस्त फलंदाजी केली. त्यामुळे शिखर धवन आणि केएल राहुल यांची कारकिर्द धोक्यात आली आहे. टी20 मध्ये रोहित शर्माने केएल राहुलसोबत शतकी खेळी केली आहे. दोघेही चांगले मित्र आहेत. मात्र त्याचा सध्याचा फॉर्म पाहता आता सलामीसाठी केएल राहुल किंवा शिखर धवन यांना पुनरागमन करणं कठीण जाणार आहे. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्माने आतापर्यंत अनेक विक्रम केले आहेत. त्याला कसोटीत संधी मिळत नव्हती. ती वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत मिळाली. यामध्ये रोहितनं आपण कसोटीतही फिट असल्याचं दाखवून दिलं. त्याच्या या खेळीने सध्या खराब फॉर्ममुळे संघातून बाहेर असलेल्या धवन आणि केएल राहुल यांचे क्रिकेट धोक्यात आले आहे. धवनची जागा पृथ्वी शॉने घेतली होती. मात्र, पृथ्वी शॉसुद्धा बंदीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. अशा वेळी मिळालेल्या संधीचा रोहितने फायदा घेतला. रोहितला कसोटी संघात केएल राहुलच्या जागी सलामीला संधी देण्यात आली. त्यानंतर रोहितनं लागोपाठ शतकं करताना तिसऱ्या कसोटीत डबल धमाल केली. केएल राहुलचे स्थान धोक्यात आलं आहे. केएल राहुल हा सलामीवीर म्हणून संघात होता. त्याव्यतिरिक्त तो प्लेइंग इलेव्हनमध्ये फिट होत नाही. अरे हा तर चमत्कार! सामन्यात कॅच पकडताना दिसला सुपरमॅन, पाहा LIVE VIDEO नाणेफेकीत दोन कर्णधारांना हरवल्यावर विराटला आवरलं नाही हसू, पाहा VIDEO SPECIAL REPORT : शरद पवारांची ‘ही’ सभा निवडणुकीच्या इतिहासात लिहिणारी!