अरे हा तर चमत्कार! सामन्यात कॅच पकडताना दिसला सुपरमॅन, पाहा LIVE VIDEO

अरे हा तर चमत्कार! सामन्यात कॅच पकडताना दिसला सुपरमॅन, पाहा LIVE VIDEO

LIVE सामन्यात दिसला सुपरमॅन, चाहते झाले हैराण.

  • Share this:

सिडनी, 18 ऑक्टोबर : क्रिकेटच्या मैदानात अनेक ऐतिहासिक खेळी आपण पाहिल्या असतील. हे सगळे अवलंबून असते खेळाडूंच्या मैदानावरच्या खेळीवर, मात्र काही वेळा असे प्रसंग घडतात की तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवता येत नाही. ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर अॅलेक्स कॅरी (Alex Carey) ने लाइव्ह सामन्यात असा अजब कारनामा केला.

ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर अॅलेक्स कॅरीने कॅच घेताना जी कमाल कामगिरी केली, ती पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही. अॅलेक्स कॅरीनं शेफील्ड शील्ड मॅचमध्ये एक जबदरस्त कॅच पकडत चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

क्विन्सलॅंड आणि दक्षिण ऑस्ट्रेलिया यांच्या झालेल्या सामन्यात हा प्रसंग पाहायला मिळाला. क्विन्सलॅंडचा सलामीचा फलंदज मॅट रेनशॉनं लेग साइडला टाकलेल्या चेंडूवर शॉट लगावण्याचा प्रयत्न केला. यावेळी अॅलेक्स कॅरीनं सुपरमॅन सारखी कॅच घेऊन फलंदाजासह सर्वांना हैराण केले. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं आपल्या अकाऊंटवर हा व्हिडीओ टाकला आहे. यावर सोशल मीडियावर चाहत्यांनी कौतुक करण्यास सुरुवात कली आहे.

या सुपरमॅनला कसोटी संघात नाही मिळाली जागा

अॅलेक्स कॅरीनं जबरदस्त कॅच घेत क्विन्सलॅंडला फक्त 222 धावांवर बाद केले. अॅलेक्स कॅरीनं टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली असली तरी, कसोटी संघात त्याला स्थान देण्यात आलेले नाही.

'चंपा'वर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, राज ठाकरे यांना म्हणाले...

Published by: Priyanka Gawde
First published: October 18, 2019, 5:24 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading