मुंबई, 08 मार्च : माजी भारतीय वेगवान गोलंदाज इरफान पठाणने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याचा मुलगा इम्रान क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणार्या सचिन तेंडुलकरबरोबर मस्ती करताना दिसत आहे. सचिनही त्याच्यासोबत मज्जा करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये इम्रान सचिनसोबत बॉक्सिंग करताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सचिन इरफान पठाणच्या मुलासोबत आपली उंची मोजताना दिसत आहे. त्यानंतर इम्रानने सचिनसोबत बॉक्सिंग करण्यास सुरुवात केली. हा व्हिडिओ अपलोड करताना इरफान पठाणने, “माझ्या लेकाला माहित नाही आहे त्याने काय केले आहे ते. तो मोठा झाल्यावर कळेल…”, असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओला चाहत्यांकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वाचा- VIDEO : 41 वर्षांचा जहीर खान झाला सुपरमॅन! हवेत उडी मारत घेतला शानदार कॅच काही क्रिकेट चाहत्यांनी ज्युनिअर पठाणला नेहमी आनंदी राहण्याचे आशीर्वाद दिले आहेत. दरम्यान सचिन आणि इरफान पठाण सध्या रोड सेफ्टी चॅरिटी लीग खेळत आहेत. शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंडिया लिजेंड्स आणि वेस्ट इंडिज लिजंड्स यांच्यात झाला. हा सामना इंडिया लिजेंड्सने 7 गडी राखून जिंकला. या सामन्यानंतर हा व्हिडिओ इरफानने पोस्ट केला. वाचा- VIDEO : पांड्याच्या शानदार खेळीनंतर चाहत्यांना याड लागलं, मैदानावरच घातला राडा
वाचा- Road Safty World Series : पहिल्याच चेंडूवर सेहवागचा ‘पुराना’ अंदाज, पाहा VIDEO विंडिजने दिलेल्या 150 धावांचा पाठलाग करताना इंडिया लिजंड्सच्या सचिन आणि सेहवाग या सलामीच्या जोडीने 83 धावांची भागिदारी केली. त्यानंतर सेहवागने एका बाजुने फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याच्यासोबत मोहम्मद कैफने 14 तर युवराज सिंगने नाबाद 10 धावा काढल्या. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून इंडिया लिजंडने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीला उतरलेल्या विंडिज लिजंडने शिवनारायन चंदरपॉलच्या अर्धशतकी आणि डॅरेन गंगाच्या फटकेबाजीच्या जोरावर 20 षटकात 8 बाद 150 धावा केल्या. चंदरपॉलने 41 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. तर डॅरेन गंगाने 24 चेंडूत 32 धावांची वेगवान खेळी केली. यांच्या व्यतिरिक्त ब्रायन लारा 17 धावा, डॅन्झा हॅट 12 धावा तर टिनो बेस्ट 11 धावांवर बाद झाले. इतर खेळाडूंना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.