JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Rishabh Pant : सचिनसाठी 'देवदूत' ठरलेला आता पंतसाठी मैदानात, ऋषभचं करिअर ट्रॅकवर येणार!

Rishabh Pant : सचिनसाठी 'देवदूत' ठरलेला आता पंतसाठी मैदानात, ऋषभचं करिअर ट्रॅकवर येणार!

टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतला डेहराडूनवरून मुंबईत आणण्यात आलं आहे. सचिन तेंडुलकरसाठी देवदूत ठरलेले डॉक्टर ऋषभ पंतवर उपचार करणार आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 जानेवारी : टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतला डेहराडूनवरून मुंबईत आणण्यात आलं आहे. ऋषभ पंतवर आता मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल ऍण्ड मेडिकल रिसर्च इन्सिट्यूटमध्ये उपचार होणार आहेत. हॉस्पिटलचे स्पोर्ट्स मेडिसिन ऍण्ड ऑर्थोस्कोपी हेड डॉक्टर दिनशॉ पारदीवाला यांच्या देखरेखीमध्ये पंतवर उपचार करण्यात येतील, असं बीसीसीआयने सांगितलं आहे. दिनशॉ पारदीवाला यांनी याआधी सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या भारतीय क्रिकेटपटूंवर उपचार केले. मुंबईमध्ये पंतवर लिगामेंट टियरची शस्त्रक्रिया करण्यात येईल आणि मग पुढचे उपचार होतील. 25 वर्षांच्या ऋषभ पंतला डेहराडूनच्या रुग्णालयातून एयरएम्ब्युलन्सने मुंबईत आणलं गेलं. मुंबईमध्ये ऋषभ पंतचा गुडघा आणि घोट्याचा लिगामेंटवर उपचार होईल. 30 डिसेंबरला कार अपघातामध्ये ऋषभ पंतला दुखापत झाली. बीसीसीआयने ऋषभ पंतला एयरएम्ब्युलन्सने मुंबईत आणण्याचा निर्णय घेतला. पंतची दुखापत गंभीर ऋषभ पंत भयावह कार अपघातामध्ये थोडक्यात बचावला. पंत दिल्लीहून रुडकीच्या त्याच्या घरी जात होता तेव्हा राष्ट्रीय महामार्ग 58 वर त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं. पंतची कार डिव्हायडरला जाऊन आदळली. पंतच्या कपाळावर दुखापतीच्या खुणा होत्या, तसंच पाठ, गुडघा आणि घोट्याची त्याची दुखापत गंभीर आहे. डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पंतचा दुखापतग्रस्त गुडघा आणि घोट्याचा एमआरआय होऊ शकला नाही, कारण त्याच्या गुडघा आणि घोट्यावर खूप जास्त सूज होती. पुनरागमन कधी? ऋषभ पंतचं क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन कधी होणार? हे अजून निश्चित नाही, कारण पंत अजूनही चालू शकत नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धची टेस्ट सीरिज आणि आयपीएलच्या 16व्या मोसमात ऋषभ पंतचं खेळणं अशक्य वाटत आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली टेस्ट सीरिज 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तर आयपीएलला एप्रिल महिन्यात सुरूवात होईल. बीसीसीआयशी करारबद्ध असलेल्या खेळाडूंचे उपचार ठरलेल्या डॉक्टरांकडून केले जातात. या अपघातातून बरा झाल्यानंतर पंतचं एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन केलं जाईल. एनसीएमध्ये डॉक्टर नितीन पटेल यांच्या देखरेखीखाली पंतला मॅच फिट केलं जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या