गुजरात, 20 जानेवारी : एकीकडे टीम इंडिया आंतरराष्ट्रीय मालिका खेळत आहे. तर त्याचवेळी रणजी ट्रॉफीचे सामनेही अत्यंत उत्साहपूर्ण मार्गाने सुरू आहेत. 19 जानेवारीपासून पंजाब आणि गुजरात यांच्यात सामना सुरू झाला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर गुजरात संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामना सुरू होण्यास बराच काळ झाला नाही आणि त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गोलंदाज मयंक मार्कंडे हवेत उडत कॅच घेताना दिसत आहे. वाचा- VIDEO : स्मिथने आपल्याच कर्णधाराला दिला धोका, फिंचने मैदानातच घातल्या शिव्या! वाचा- टीम इंडियाच्या मॅचविनर खेळाडूने हातात बंदूक घेऊन केला होता आत्महत्येचा प्रयत्न
वाचा- भारताचा स्टार गोलंदाज सोडणार देश, इंग्लंडमधून क्रिकेट खेळण्याच्या तयारीत! वाचा- ‘3 दिवसांत फिट हो नाहीतर…’, हार्दिक पांड्याला निवड समितीनं दिली डेडलाईन मयंक मार्कंडेचा शानदार कॅच गुजरात आणि पंजाब यांच्यात रणजी करंडक सामना खेळला जात आहे. कर्णधार पार्थिव पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परिणामी, पंजाब संघ प्रथम गोलंदाजी करीत आहे. या दरम्यान, प्रियांम पांचाल बाद झाल्यानंतर पार्थिव पटेल मैदानात आले. अवघ्या 2 धावा करत बालेत सिंगच्या चेंडूवर त्याने विकेट गमावली. बलतेज सिंगच्या चेंडूवर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच क्षेत्ररक्षण करणाऱ्या मयंक मार्कंडेने हवेत उडी मारत शानदार कॅच पडकला. हा झेल इतका नेत्रदीपक आहे की त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर गुजरातचा संघ प्रथम फलंदाजीला आला आणि त्याने 104 धावांवर 4 विकेट गमावल्या. संघाचा कर्णधार पार्थिव पटेल अवघ्या 2 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर प्रियम पांचालने 21, मनप्रीत जुनिझाने 26 धावा, समित गोहेलने 7 धावा केल्या. भार्गव मेराई 50 धावांवर नाबाद खेळत आहे.