JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / द्रविडच्या मुलांचे वडिलांच्या पावलावर पाऊल, लहानगा बनला कॅप्टन, मोठ्याने केलंय द्विशतक

द्रविडच्या मुलांचे वडिलांच्या पावलावर पाऊल, लहानगा बनला कॅप्टन, मोठ्याने केलंय द्विशतक

राहुल द्रविडची दोन्ही मुले आता त्याच्याच पावलावर पाऊल टाकत क्रिकेटमध्ये कारकिर्द सुरू करत आहेत. लहान मुलाने राहुल द्रविडप्रमाणेच कमाल करत कर्नाटक संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी घेतलीय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बंगळुरू, 19 जानेवारी : भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड हा त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. भारताकडून फलंदाज, यष्टीरक्षक आणि कर्णधार म्हणून तो खेळला. त्यानतंर सध्या संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. राहुल द्रविडची दोन्ही मुले आता त्याच्याच पावलावर पाऊल टाकत क्रिकेटमध्ये कारकिर्द सुरू करत आहेत. लहान मुलाने राहुल द्रविडप्रमाणेच कमाल करत कर्नाटक संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी घेतलीय. अन्वय द्रविडला अंडर १४ आंतरविभागीय स्पर्धेसाठी कर्नाटकच्या संघाचा कर्णधार करण्यात आलं आहे. ही स्पर्धा २३ जानेवारीपासून ११ फेब्रुवारीपर्यंत केरळमध्ये होणार आहेत. दोन दिवसीय सामने यामध्ये खेळले जाणार आहेत. राहुल द्रविडचा मोठा मुलगा समित हासुद्धा क्रिकेटपटू असून त्याने अंडर १४ क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याची कामगिरीसुद्धा केलीय. हेही वाचा :  200 केल्यास आणि 3 सामन्यात बाहेर बसलास? रोहितच्या प्रश्नावर इशान म्हणाला, भाई.. अन्वयने राहुल द्रविडच्या पावलावर पाऊल टाकताना संघाचं नेतृत्व आणि कर्णधार अशी भूमिका पार पाडत आहे. राहुल द्रविडसुद्धा भारतीय संघाकडून यष्टीरक्षक म्हणून खेळला आहे. धोनीनेसुद्धा यष्टीरक्षक म्हणून खेळायला सुरुवात केली होती. आता अन्वय यष्टीरक्षक आणि कर्णधार म्हणून अंडर १४ विभागीय स्पर्धेत खेळणार आहे.

सध्या राहुल द्रविड भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची धुरा सांभाळत आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना २१ तारखेला तर अखेरचा सामना २४ जानेवारीला होणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. यानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी पुन्हा एकत्र येईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ सामन्यांची कसोटी मालिका ९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या