JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पृथ्वी शॉने मिस्ट्री गर्लसोबत सेलिब्रेट केलं न्यू इयर! पाहा कोण आहे ती? नाशिकशी खास कनेक्शन

पृथ्वी शॉने मिस्ट्री गर्लसोबत सेलिब्रेट केलं न्यू इयर! पाहा कोण आहे ती? नाशिकशी खास कनेक्शन

भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याने नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये पृथ्वीसोबत एक मुलगी दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 जानेवारी : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याने नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. मुंबईतल्या एका पबमध्ये पृथ्वीने नव्या वर्षाचं स्वागत केल्याचं सांगितलं जात आहे. शॉने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये नव्या वर्षाच्या पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शॉ एका मुलीसोबत दिसत आहे. याआधीही ही मुलगी पृथ्वी शॉच्या अनेक इन्स्टाग्राम स्टोरीवर दिसली आहे. निधी रवी तपाडिया असं पृथ्वी शॉसोबत असलेल्या मुलीचं नाव आहे. निधी ही बऱ्याच प्रादेशिक चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आहे. 2016 साली निधी तपाडियाने 2016 साली टीव्ही सीरियलमध्ये पदार्पण केलं. सीआयडी या लोकप्रिय मालिकेमध्येही निधीने काम केलं. याशिवाय ती मॉडेलिंगही करते. नवरात्रीमध्ये पृथ्वी शॉ निधी तपाडियाकडूनच गरबा शिकत असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. निधी तपाडिया नाशिकची रहिवासी आहे. पृथ्वी शॉ हा सध्या मुंबईकडून रणजी ट्रॉफीचा 2022-23 चा मोसम खेळत आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉ मोठ्या प्रमाणावर रन करत आहे, तसंच आयपीएलमध्येही दिल्लीकडून खेळताना त्याने फॉर्म दाखवला आहे, पण त्याला टीम इंडियात स्थान मिळत नाहीये.

टीम इंडियामध्ये स्थान मिळत नसल्यामुळे पृथ्वी शॉने उघडपणे नाराजीही व्यक्त केली आहे. टी-20 वर्ल्ड कपमधल्या टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर पृथ्वी शॉला टीममध्ये घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे, पण निवड समितीने अजूनही त्याच्यावर विश्वास दाखवलेला नाही. जुलै 2021 साली पृथ्वी शॉ भारताकडून शेवटची मॅच खेळला. श्रीलंकेविरुद्धच्या त्या टी-20 नंतर शॉ अजूनही संधीची वाट बघत आहे.

संबंधित बातम्या

न्यूझीलंडविरुद्धची सीरिज, बांगलादेश दौऱ्यातली वनडे आणि टेस्ट सीरिज तसंच श्रीलंकेविरुद्धची येऊ घातलेल्या सीरिजमध्येही पृथ्वी शॉला संधी देण्यात आलेली नाही. 3 जानेवारीपासून मुंबईत या सीरिजला सुरूवात होत आहे. 2019-20 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापर्यंत पृथ्वी शॉ भारतीय टेस्ट टीमचा भाग होता, पण पहिल्याच टेस्टमध्ये मिचेल स्टार्कने शॉला दोन्ही इनिंगमध्ये 10 पेक्षा कमी बॉलमध्ये आऊट केलं, यानंतर शॉ भारतीय टेस्ट टीममध्ये परत दिसला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या