मुंबई, 7 मे : इंडियन प्रीमियर लीगमध्ये अनेकदा पंचांना चुकीच्या निर्णयामुळे ट्रोल केले जाते. शनिवारी मात्र पंचांनी संघाची मोठी चूक पकडली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यातील हंगामातील 52व्या सामन्यादरम्यान ही घटना घडली. अंपायरला राजस्थान रॉयल्सचा एक खेळाडू मैदानावर क्षेत्ररक्षण करताना आढळला ज्याचे नाव संघाच्या यादीत आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हते. मग काय, अंपायरने लगेच त्या खेळाडूला मैदान सोडण्यास सांगितले. या खेळाडूचे नाव आहे, करुण नायर. (Karun Nair) पंजाब किंग्जचा कर्णधार मयंक अग्रवालने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, करुण नायर बदली खेळाडू म्हणून मैदानात आला. त्यानंतर अंपायरने चूक पकडली आणि डावाच्या तिसऱ्या षटकात त्याला मैदानाबाहेर पाठवण्यात आले. प्लेइंग-इलेव्हनमधील कोणत्याही खेळाडूची कोणतीही मोठी समस्या नसल्यास, खेळ सुरू होताच बदली खेळाडूला मैदानात उतरवता येत नाही. करुण नायरला पुन्हा तंबूत मग काय करुण नायरला परतावे लागले. यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने त्याच खेळाडूला बोलावलं ज्याचं नाव संघाच्या यादीत समाविष्ट होते. या सामन्यात करुण नायर प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही. पंजाब किंग्जने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. राजस्थान रॉयल्सने करुण नायरच्या जागी यशस्वी जैस्वालला संधी दिली आहे.
जॉनी बेअरस्टोने मिळवलं IPL मधील दिग्गज फलंदाजांच्या रांगेत स्थान! कामगिरी तर वाचा
पंजाबसाठी ही स्पर्धा महत्त्वाची पंजाबसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे कारण त्यांच्याकडे आता फक्त 10 गुण आहेत. 10 पैकी पाच सामने गमावलेल्या पंजाब फ्रँचायझीला आता प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी सलग सामने जिंकावे लागणार आहेत. पंजाबने उर्वरित चारपैकी तीन सामने जिंकले, तर पुढील टॉप-4साठी लढणे त्यांच्यासाठी थोडे सोपे होईल. त्याचबरोबर संजू सॅमसनच्या संघाने अद्याप प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केलेले नाही. 10 सामन्यांनंतर त्यांचे सहा विजय आहेत. अशा परिस्थितीत, उर्वरित चार सामन्यांपैकी त्यांना किमान दोन सामने जिंकावे लागतील. पंजाबने गेल्या सामन्यात गुजरातसारख्या मोठ्या संघाचा पराभव केला आहे. तर राजस्थानने गेल्या दोन सामन्यात मुंबई आणि कोलकाता संघाकडून पराभव स्वीकारला आहे. मुंबई इंडियन्सच्या विजयानंतरही रोहित टेन्शनमध्ये, सर्वात मोठा मॅच विनर होणार Out पंजाब किंग्ज : मयंक अग्रवाल, शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा, ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, संदीप शर्मा, अर्शदीप सिंग राजस्थान रॉयल्स : जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, आर. अश्विन, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप सेन