नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी गेल्या काही महिन्यांपासून सततच्या दुखापतीने त्रस्त आहे. आशिया चषकापूर्वी श्रीलंका दौऱ्यावर दुखापत झाल्यानंतर त्याने टी-20 विश्वचषकात पुनरागमन केले. मात्र, फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना त्याला पुन्हा एकदा दुखापत झाली आणि पुढील काही महिने तो मैदानाबाहेर झाला. रविवारी, 20 नोव्हेंबर रोजी शाहीनने चाहत्यांना त्याच्या दुखापतीबद्दल ट्विट करत अपडेट दिली. पाकिस्तानचा स्टार स्टार शाहीनला मैदानात परतण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुखापत झाल्यानंतर तो जवळपास तीन महिने क्रिकेटपासून दूर होता. ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या ICC T20 विश्वचषकात तो परतला. पण 13 नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात तो पुन्हा जखमी झाला. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला 4 षटकांचा कोटाही पूर्ण करता आला नाही. दुखापतीशी झगडतोय शाहीन आफ्रिदी - शाहीन आफ्रिदी सतत दुखापतीशी झुंजत आहे. T20 विश्वचषकापूर्वीच तो गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. मात्र, तीन महिन्यांच्या नंतर तो दुखापतीतून सावरला आणि विश्वचषकात पाकिस्तानच्या संघात सामील झाला. पण इंग्लंडविरुद्धच्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला पुन्हा दुखापत झाली. यावेळी त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे शाहीनला अंतिम फेरीत गोलंदाजी करता आली नाही. याचे परिणाम पाकिस्तान संघाला भोगावे लागले आणि संघाला विजेतेपदाचा सामना गमवावा लागला. तर रविवारी, 20 नोव्हेंबर रोजी शाहीनने त्याच्या सर्व चाहत्यांसह त्याच्या शस्त्रक्रियेची माहिती शेअर केली. हॉस्पिटलच्या बेडवर पडलेला फोटो ट्विटरवर शेअर करुन त्याने ही माहिती दिली. शाहीनचे अपेंडिक्सचे ऑपरेशन झाले आहे आणि त्याने लिहिले की, आज माझे अपेंडिक्सचे ऑपरेशन झाले पण देवाच्या कृपेने मला खूप बरे वाटत आहे. तुम्ही सर्व माझ्यासाठी प्रार्थना करा.
दुखापतीमुळे शाहीनला पुढील काही आठवडे क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेतही तो खेळू शकणार नाही. तो सध्या रुग्णालयात असून डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही दिवस घरीच राहिल्यानंतर त्याला पुन्हा संघात स्थान मिळेल.