JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / On This Day : 10 रन देत 8 विकेट्स घेणारा भारताचा ‘हा’ बॉलर माहितीय का?

On This Day : 10 रन देत 8 विकेट्स घेणारा भारताचा ‘हा’ बॉलर माहितीय का?

भारतीय बॉलरनं इनिंगमध्ये फक्त 10 रन देऊन 8 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. चार वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (20 सप्टेंबर 2018) हा विक्रम घडला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 सप्टेंबर :  क्रिकेटमधील काही विक्रम हे ‘न भूतो’ प्रकारातील असतात. सचिन तेंडुलकरनं झळकावलेली शंभर आंतरराष्ट्रीय शतक, लसिथ मलिंगाने दोन वेळा सलग 4 बॉलवर घेतलेल्या विकेट्स किंवा युवराज सिंहनं स्टुअर्ट ब्रॉडच्या बॉलिंगवर एकाच ओव्हरमध्ये लगावलेले सलग 6 सिक्स. हे विक्रम क्रिकेट फॅन्सच्या आजही लक्षात आहेत. त्याचबरोबर एका भारतीय बॉलरनं इनिंगमध्ये फक्त 10 रन देऊन 8 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. चार वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (20 सप्टेंबर 2018) हा विक्रम घडला होता. याबाबत क्रिकेट फॅन्सना फार माहिती नाही. कुणी केला विक्रम? देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करणाऱ्या  शाहबाज नदीमनं ‘‘विजय हजारे वन डे टूर्नामेंट’मध्ये हा विक्रम केला आहे. नदीमनं झारखंडकडून खेळताना राजस्थान विरूद्ध ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या मॅचमध्ये शाहबाजने 2 ओव्हरमध्ये ओव्हर हॅट्ट्रिकही पूर्ण केली होती. टीम इंडियाचा विकेट किपर इशान किशन त्या मॅचमध्ये झारखंडचा कॅप्टन होता. लिस्ट ए क्रिकेटमध्ये जगातील कोणत्याही बॉलरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. पण, ही कामगिरी करणाऱ्या नदीमला अद्याप भारतीय टीमकडून एकही वन-डे सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यानं 2 टेस्टमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 20 सप्टेंबर 2018 रोजी चेन्नई येथे झालेल्या झारखंडविरुद्ध राजस्थान या मॅचमध्ये राजस्थानने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. टीमची सुरुवात समाधानकारक झाली. त्यांचा 1 आऊट 41 असा स्कोअर होता. यानंतर  नदीम बॉलिंग करण्यासाठी आला, आणि त्याने संपूर्ण राजस्थान टीमला संकटात टाकले. राजस्थानाची टीम 28.3 ओव्हरमध्ये 73 रन करून ऑल आऊट झाली. 8 खेळाडूंना दोन अंकी रन सुद्धा करता आल्या नाहीत. क्रिकेटच्या मैदानात पुन्हा ‘सचिन… सचिन…’, पाहा सचिननच्या ग्रँड एन्ट्रीचा Video अशी केली हॅट्ट्रिक शाहबाज नदीमने या मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्याने 20 व्या ओव्हरच्या 5 व्या बॉलवर महिपाल लोमरोरला बोल्ड केलं. त्यानंतर चेतन बिश्तही शेवटच्या बॉलवर आउट झाला. पुढच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर शाहबाजने तेजिंदरसिंगला एलबीडब्ल्यु करून हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्याने 10 ओव्हरमध्ये 4 मेडन ओव्हर टाकल्या होत्या. या मॅचमध्ये त्याने 10 रन देत 8 विकेट घेतल्या होत्या. ही लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. या पूर्वी हा विक्रम भारताचा डावखुरा स्पिनर राहुल सांघवीच्या नावावर होता. दिल्लीकडून खेळताना त्याने 1997 मध्ये हिमाचलविरुद्ध चांगली कामगिरी करताना 9.5 ओव्हरमध्ये 15 रन देत 8 विकेट घेतल्या होत्या. झारखंडचा सहज विजय या मॅचमध्ये झारखंडने राजस्थानवर सहज विजय मिळवला होता. 14.3 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावत त्यांनी हे लक्ष्य गाठलं. आनंदसिंगने सर्वाधिक 22 रन्स केल्या. इशान किशननं फक्त 1 रन काढला.  सौरभ तिवारी 19 आणि सुमित कुमार 19 रनांवर नॉटआउट राहिले

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या