नवी दिल्ली, 14 एप्रिल: यंदाच्या आयपीएलमध्ये**(IPL 2022)** 10 संघ खेळताना दिसत आहेत. आत्तापर्यंत 24 सामने पार पडले आहेत. मात्र, आयपीएलच्या महाकुंभात चॅम्प असणाऱ्या दोन संघाची गाडी रुळावरुन घसरली असल्याचे पाहायला मिळता आहे. गतवर्षी आयपीएल विनर चेन्नई सुपर किंग्जने**(CSK)** पाचव्या सामन्यात दमदार पुनरागमन करत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पराभवाचा धक्का दिला. तर मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) अजूनही विजयी पताका फडकवता आलेला नाही. अशातच टीम इंडियाचा माजी दिग्गज क्रिकेटर विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) दोन्ही टीम संदर्भात अजब वक्तव्य केलं आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना सेहवागने या दोन्ही टीम तळाशीच राहू द्या, ते तिथंच चांगले दिसतात असे अजब वक्तव्य केलं आहे. तो म्हणाला, मी यापूर्वीच सांगितलं होतं, श्रीमंत संघांना सर्वात खालीच राहू द्या. चेन्नई आणि मुंबई हे संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर चांगले दिसतात. त्यांचे जिंकणे कठीण दिसते. मला नाही वाटत की, सूर्यकुमार यादवला माहिती होते की, अखेरचे षटक ओडियन स्मिथ किंवा लियाम लिविंगस्टोन टाकेल. जर त्याला माहिती असते, तर शेवटच्या ओव्हरसाठी 25 धावांपर्यंत सहज पोहोचता आले असते. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहेत. आयपीएल 2022 मधील इतर संघांच्या तुलनेत मुंबईने सर्वाधिक 5 वेळा आयपीएलचे किताब जिंकले आहेत. मात्र, असे असूनही त्यांना या हंगामात गुणतालिकेत 10 व्या स्थानी समाधान मानावे लागले आहे. मुंबईने आतापर्यंत 5 वेळा, तर चेन्नईने 4 वेळा आयपीएलचा किताब पटकावला आहे. मात्र, हे दोन्ही संघ आयपीएल 2022 मध्ये संघर्ष करताना दिसत आहेत. त्यांच्यासाठी यंदाच्या सीझनचा प्रवास खडतर बनला आहे. मुंबई संघ सलग 5 सामन्यातील पराभवासह गुणतालिकेत शेवटच्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे चेन्नई शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध विजय मिळवत 5 पैकी 1 सामना जिंकण्यात यशस्वी झाला. दुसरीकडे चेन्नईनेदेखील सलग 4 सामन्यात पराभूत व्हावे लागले होते.