मुंबई : अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यानंतर पाकिस्तानचा स्टार खेळाडू नसीम शाह आणि उर्वशी रौतेलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. उर्वशीनं स्वत: तो व्हिडीओ देखील आपल्या इन्स्टावर पोस्ट केला. त्यानंतर या दोघांच्या अफेयर्सच्या चर्चाही रंगल्या. एवढंच नाही तर उर्वशीला खूप ट्रोल देखील करण्यात आलं. या सगळ्या प्रकरणावर अखेर पाकिस्तानचा क्रिकेटर नसीम शाहने मौन सोडलं. त्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक असली तरी ती खरी असल्याचं त्याचं म्हणणं आहे. पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाह सध्या भारतीय अभिनेत्री उर्वशी रौतेलामुळे खूप चर्चेत आहे. उर्वशीने काही दिवसांपूर्वी रोमँटिक रीलशेअर केला होता, ज्यानंतर उर्वशी आणि नसीमच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या. त्या व्हिडिओमध्ये उर्वशी दुबई स्टेडियममध्ये भारत-पाकिस्तान सामन्याचा आनंद घेताना दिसत आहे आणि नसीम तिला पाहून हसत आहे.
या व्हिडिओनंतर उर्वशीलाही ट्रोल करण्यात आले, त्यानंतर तिने हा व्हिडिओ डिलीट केला. आता पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहने उर्वशीसोबतच्या नात्यावर धक्कादायक वक्तव्य केलं. नसीम म्हणाला कोण उर्वशी तिला मी ओळखत नाही. लोक असे व्हिडीओ का बनवतात ते मला कळत नाही. माझं हसणं जर कोणाला आवडत असेल तर तो त्याचा प्रश्न. माझं सध्या लक्ष सगळं क्रिकेटकडे आहे. मला खेळायचं आहे. नसीमने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.