JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / हॉकी वर्ल्ड कप शुक्रवारपासून; भारताचे सामने कधी, कुठे पाहता येणार?

हॉकी वर्ल्ड कप शुक्रवारपासून; भारताचे सामने कधी, कुठे पाहता येणार?

13 जानेवारीपासून पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा २०२३ सुरू होणार आहे. या विश्वचषकासाठी क्रीडा प्रेमी उत्साहित असून यंदाचा विश्वचषक कोण पटकावणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 जानेवारी : पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा 2023 चे बिगुल लवकरच वाजणार आहे. हॉकी विश्वचषक स्पर्धेला भारतातील ओडिशा येथे 13 जानेवारी पासून सुरुवात होणार असून यात 16 संघानी सहभाग नोंदवला आहे.  विश्वचषकाचे सामने भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियम आणि राउरकेला येथील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर होणार आहेत. या विश्वचषकासाठी क्रीडा प्रेमी उत्साहित असून यंदाचा विश्वचषक कोण पटकावणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. 13 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत 16 संघांमध्ये एकूण 44 सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर 19 जानेवारीपर्यंत गट सामने आणि 24 जानेवारीपासून उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळवले जातील.  पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना हा 29 जानेवारीला होणार आहे. 16 संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. भारताचा पहिला सामना 15 जानेवारी रोजी इंग्लड सोबत होणार आहे. तर दुसरा सामना भारत विरुद्ध वेल्स यांच्यात 19 जानेवारीला होईल. हे ही वाचा : पृथ्वी शॉचं तिहेरी शतक, पण अजूनही मोडू शकला नाही निंबाळकरांचा 74 वर्षे जुना रेकॉर्ड कोणता संघ कोणत्या गटात ? अ गट :  ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, फ्रान्स आणि दक्षिण आफ्रिका ब गट :  बेल्जियम, जर्मनी, दक्षिण कोरिया आणि जपान क गट :  नेदरलँड, न्यूझीलंड, मलेशिया आणि चिली ड गट :  भारत, इंग्लंड, स्पेन आणि वेल्स भारतीय संघ (हॉकी विश्वचषक २०२३) : हरमनप्रीत सिंग (कर्णधार), अमित रोहिदास (उपकर्णधार), पीआर श्रीजेश (गोलकीपर), कृष्णा पाठक (गोलकीपर), सुरेंद्र कुमार, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, नीलकांत शर्मा, शमशेर सिंग, विवेक सागर प्रसाद, नीलम संजीप एक्स, आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, राजकुमार पाल, जुगराज सिंग, ललितकुमार उपाध्याय, अभिषेक, सुखजित सिंग. कुठे पाहता येणार सामने? पुरुष हॉकी विश्वचषक 2023 याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर केले जाणार आहे.  भारतीय चाहत्यांना हॉकी विश्वचषकाचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स चॅनलवर पाहता येतील. तर या सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण Disney+Hotstar या ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर देखील पाहता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या