JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / केएल राहुलच्या अडचणी संपेना, आता कोरोनाची लागण, T20 सीरिजमधून बाहेर!

केएल राहुलच्या अडचणी संपेना, आता कोरोनाची लागण, T20 सीरिजमधून बाहेर!

टीम इंडियाचा स्टार खेळाडू केएल राहुलसमोरच्या (KL Rahul Corona Positive) अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्याआधी केएल राहुलची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जुलै : टीम इंडियाचा स्टार खेळाडू केएल राहुलसमोरच्या (KL Rahul Corona Positive) अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्याआधी केएल राहुलची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे तो 29 जुलैपासून सुरू होणाऱ्या टी-20 सीरिजमध्ये (India vs West Indies) खेळण्याची शक्यता कमी आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 5 टी-20 मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बोर्डाच्या बैठकीनंतर राहुलला कोरोना झाल्याची माहिती दिली. केएल राहुलने गुरूवारी बँगलोरच्या एनसीएमध्ये लेव्हल 3 कोच सर्टिफिकेशन कोर्समध्ये भाग घेण्यासाठी आलेल्या उमेदवारांना संबोधित केलं होतं. काहीच दिवसांपूर्वी राहुलच जर्मनीमध्ये हर्नियाचं ऑपरेशन झालं होतं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या वनडे सीरिजसाठी आराम देण्यात आला होता. आयपीएल 2022 नंतर केएल राहुल भारताकडून एकही सामना खेळला नाही. हार्नियाच्या दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सीरिज आणि मग त्यानंतर इंग्लंड दौऱ्यातही खेळू शकला नाही. आता कदाचित वेस्ट इंडिज दौऱ्यातही त्याची खेळण्याची शक्यता कमी आहे. याआधीही बरेच वेळा दुखापतीमुळे राहुलला टीम इंडियाबाहेर राहावं लागलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या