JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL सुरू असतानाच पोलार्डने घेतला धक्कादायक निर्णय, क्रिकेट विश्वात खळबळ

IPL सुरू असतानाच पोलार्डने घेतला धक्कादायक निर्णय, क्रिकेट विश्वात खळबळ

आयपीएल 2022 साठी (IPL 2022) वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर कायरन पोलार्ड (Kieron Pollard) सध्या भारतात आहे. पोलार्ड हा मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीमचा महत्त्वाचा भाग आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 एप्रिल : आयपीएल 2022 साठी (IPL 2022) वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर कायरन पोलार्ड (Kieron Pollard) सध्या भारतात आहे. पोलार्ड हा मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीमचा महत्त्वाचा भाग आहे, पण आयपीएलच्या या मोसमात पोलार्डची कामगिरी निराशाजनक झाली आहे, याचा परिणाम मुंबईच्या कामगिरीवर झालेला आहे. या हंगामातल्या पहिल्या 6 सामन्यांमध्ये मुंबईचा पराभव झाला आहे. आयपीएल खेळण्यासाठी भारतात असलेल्या पोलार्डने धक्कादायक निर्णय घेतला आहे. पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय (Kieron Pollard Retirement) घेतला आहे. जगातल्या वेगवेगळ्या टी-20 लीगमध्ये विक्रम करणाऱ्या पोलार्डने अचानक हा निर्णय घेतल्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे. आयपीएल सुरू व्हायच्या आधी वेस्ट इंडिजची टीम भारतात होती, त्यावेळी वनडे आणि टी-20 सीरिजसाठी पोलार्ड वेस्ट इंडिजचा कर्णधार होता, या सीरिजमध्ये वेस्ट इंडिजची कामगिरी निराशाजनक झाली होती. वनडे आणि टी-20 सीरिजमध्ये भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश केलं होतं.

संबंधित बातम्या

ऑलराऊंडर असलेल्या 34 वर्षांच्या पोलार्डने 123 वनडेमध्ये 26.02 च्या सरासरीने आणि 94.42 च्या स्ट्राईक रेटने 2,706 रन केले, यात 3 शतकं आणि 13 अर्धशतकांचा समावेश होता, याशिवाय त्याने 55 विकेटही घेतल्या. तसंच टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 101 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 25.31 ची सरासरी आणि 135.14 च्या स्ट्राईक रेटने 1569 रन केल्या. टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये त्याच्या नावावर 6 अर्धशतकं आहेत, तसंच त्याने 42 विकेटही मिळवल्या. 2012 साली वेस्ट इंडिजने पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला, पोलार्ड त्या टीमचा सदस्य होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या