दिल्ली, 19 जानेवारी : जगातील सर्वात वेगवान धावपटू असलेल्या जमैकाच्या उसेन बोल्टला मोठा आर्थिक फटका बसला आहे. आतापर्यंतची कमाई आणि निवृत्तीनंतर मिळालेले सर्व पैसे खात्यातून गायब झाले. लंडन ते बिजिंग ऑलिम्पिकपर्यंत धावण्याच्या शर्यतीत अनेक विश्वविक्रम केलेल्या उसेन बोल्टच्या खात्यातून थोडे थोडके नाही तर 98 कोटी रुपये उडाले आहेत. गुंतवणूक खात्यातून उसेन बोल्टचे 98 कोटी रुपये अचानक कमी झाले. त्याचे हे खाते स्टॉक्स अँड सिक्युरीटीज लिमिटेज कंपनीसोबत होतं. असोसिएट प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ही एक जमैकातील गुंतवणूक करणारी कंपनी आहे. तर बोल्टच्या वकिलांनी कंपनीला पत्र लिहून त्याचे पैसे परत देण्यास सांगितलं आहे. खरंच पैसे गेले असतील तर असं होऊ नये. आमच्या ग्राहकासोबत फसवणूक किंवा चोरी केल्याचा हा गुन्हा आहे असं वकिलांनी म्हटलं आहे. हेही वाचा : 200 केल्यास आणि 3 सामन्यात बाहेर बसलास? रोहितच्या प्रश्नावर इशान म्हणाला, भाई… उसेन बोल्टला 11 जानेवारी रोजी माहिती झालं की त्याचे पैसे गायब झाले आहेत. गेल्या बुधवारी त्याच्या वकिलांनी कंपनीकडे पैशांची मागणी केली. वकिलांनी सांगितले की, जर कंपनीने 10 दिवसात पैसे दिले नाहीत तर त्याविरोधात तक्रार दाखल केली जाईल. तर दुसऱ्या एका वृत्तानुसार, कंपनीला 8 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. कंपनीने या मुदतीत पैसे परत दिले नाहीत तर उसेन बोल्ट याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ शकतो. बोल्टच्या खात्यात जवळपास 12.8 मिलियन डॉलर इतकी रक्कम होती. वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार आता त्याच्या खात्यात फक्त 12 हजार डॉलर उरले आहेत. कंपनीकडून अद्याप यावर काहीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.