JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : रोहित शर्माने मॅच जिंकल्यानंतर पत्नीला केला Video Call, पाहा काय म्हणाली रितिका

IPL 2023 : रोहित शर्माने मॅच जिंकल्यानंतर पत्नीला केला Video Call, पाहा काय म्हणाली रितिका

मुंबई इंडियन्सने दिल्लीवर 1 विकेट्सने विजय मिळवून दिल्लीचा त्यांच्याच होम ग्राउंडवर पराभव केला. या विजयानंतर रोहित शर्माने पत्नी रितिका हिला व्हिडिओ कॉल केला, याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

जाहिरात

रोहित शर्माने मॅच जिंकल्यानंतर पत्नीला केला Video Call, पाहा काय म्हणाली रितिका

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये 16 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पारपडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्लीवर 1 विकेट्सने विजय मिळवून दिल्लीचा त्यांच्याच होम ग्राउंडवर पराभव केला. यासह मुंबईने आयपीएल 2023 मध्ये त्यांचे विजयाचे खाते उघडले. या रोमांचक विजयानंतर रोहित शर्माने पत्नी रितिका हिला व्हिडिओ कॉल केला, याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने चेन्नई आणि आरसीबी विरुद्धचे दोन सामने हरल्यानंतर काल दिल्ली विरुद्धच्या सामन्यात रोमांचक विजय मिळवला. मुंबई इंडियन्स ने  11 एप्रिल रोजी दिल्ली विरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. 20 वी ओव्हर पूर्ण होण्यापूर्वी मुंबईने दिल्लीचाय 10 विकेट्स घेऊन त्यांना 172 धावांवर रोखले. त्यानंतर मुंबईच्या संघाने दिल्लीने विजयासाठी दिलेले आव्हान 1 विकेट राखून पूर्ण केले. यात मुंबईकडून रोहित शर्माने सर्वोत्तम धाव संख्या करून अर्धशतक ठोकले.

रोमांचक सामन्यात विजय मिळवल्यानंतर रोहित शर्मा ला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. यानंतर रोहित शर्माने मैदानावरून पत्नी रितिका हिला व्हिडिओ कॉल केला. रितिकाने त्याचे आणि संपूर्ण टीमचे कौतुक केले. मुंबई इंडियन्सने रोहित आणि रितिका यांच्यातील संवादाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

संबंधित बातम्या

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते यावर लाईक्सचा वर्षाव करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या