JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 MI vs LSG : मढवालच्या धमाक्याने लखनऊचा चक्काचूर, मुंबई आणखी एका फायनलजवळ

IPL 2023 MI vs LSG : मढवालच्या धमाक्याने लखनऊचा चक्काचूर, मुंबई आणखी एका फायनलजवळ

आयपीएल 2023 मध्ये 72 वा सामना लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात पारपडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ जाएंट्सचा पराभव केला आहे.

जाहिरात

मढवालच्या धमाक्याने लखनऊचा चक्काचूर, मुंबई आणखी एका फायनलजवळ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चेन्नई, 24 मे : आयपीएल 2023 मध्ये 72 वा सामना लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात पारपडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ जाएंट्सचा पराभव केला आहे. मुंबईने लखनौचा 81 धावांनी पराभव केला असून ते एलिमिनेटर सामना जिंकून आयपीएल फायनल मॅचच्या अजून जवळ पोहोचले आहेत. तर लखनौ सुपर जाएंट्स आयपीएल 2023 स्पर्धेतील बाहेर पडले आहेत. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स यांच्यात एलिमिनेटर सामना खेळवण्यात आला. या सामन्यात सुरुवातीला मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु यावेळी मुंबईच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही. चौथ्या ओव्हरमध्ये रोहित शर्मा तर पाचव्या ओव्हरमध्ये लागोपाठ ईशान किशनची विकेट पडली. परंतु संघाने दोन विकेट गमावल्यानंतर कॅमेरून ग्रीन आणि सूर्यकुमार यादवने डाव सावरला. मुंबई इंडियन्सकडून कॅमेरून ग्रीनने 41, सूर्यकुमार यादवने 33, टिळक वर्माने 26, टीम डेविडने 13, नेहाला वधेराने 23 धावा केल्या.

लखनौच्या गोलंदाजांपैकी नवीन उल हकने ४, यश ठाकूरने ३ तर मोशीन खानने विकेट घेतली. मुंबई इंडियन्सने 20 ओव्हरमध्ये  8 विकेट्स गमावून 182 धावा केल्या आणि लखनौला विजयासाठी 183 धावांचे आव्हान दिले. विजयाचे आव्हान पूर्ण करण्यासाठी लखनौकडून प्रेरक मंकड आणि कायल मेयर हे दोघे मैदानात आले. परंतु दुसऱ्याच ओव्हरला प्रेरकची विकेट पडली. लखनौकडून मार्कस स्टोनीसने 40, दीपक हुडा 15, कायल मेयर्सने 18 धावा केल्या तर इतर कोणत्याही फलंदाजाला २ अंकी धाव संख्या करता आली नाही. अखेर लखनौचा 81 धावांनी पराभव झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांपैकी आकाश मढवालने सर्वधिक 5 विकेट्स घेतल्या. आकाशने गोलंदाजी करताना 3.3 ओव्हरमध्ये केवळ 5 धावा दिल्या. तर इतर गोलंदाजांपैकी पियुष चावला आणि चिरिश जॉर्डनने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या. तसेच ईशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या कौशल्यामुळे लखनौच्या दोन फलंदाजांना रन आउट करण्यात यशस्वी झाले. अशाप्रकारे मुंबई इंडियन्सने 16.3 ओव्हरमध्ये लखनौच्या तब्बल 9 विकेट्स घेतल्या. जबरदस्त गोलंदाजी आणि फिल्डिंगच्या जोरावर मुंबईने सेमी फायनलमध्ये धडक दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या