हे भारतीय क्रिकेटर्स आहेत शाकाहारी

इशांत शर्मा हा जुनिअर टीममध्ये क्रिकेट खेळत असताना मांसाहार करायचा. परंतु नंतर त्याने मांसाहाराचा त्याग करून आता तो केवळ शाकाहारी पदार्थांचे सेवन करतो.

IPL मध्ये कमाल दाखवणारा मनीष पांडे हा फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यासाठी शाकाहारी बनला.

हार्दिक पांड्या देखील त्याच्या आरोग्याच्या कारणांमुळे केवळ शाकाहारी पदार्थांचे सेवन करतो.

कर्णधार रोहित शर्मा हा देखील शाकाहारी आहे. परंतु तो डाएटच्या कारणामुळे तो अंड्यांचे सेवन करतो.

विराट कोहली 2018  मध्ये त्याच्या आरोग्याच्या कारणास्तव तो पूर्णतः शाकाहारी बनला. विराट केवळ शाकाहारीच नाही तर तो व्हिगन देखील आहे. म्हणजेच तो प्राण्यांना पासून मिळणारी कोणतीही गोष्ट खात नाही.

भुवनेश्वर कुमार हा लहानपणापासूनच शाकाहारी आहे. मांसाहार न करता ही त्याच्या फिटनेसकडे लक्ष देतो.

चेतेश्वर पुजारा हा देखील शुद्ध शाकाहारी आहे.

आर अश्विन देखील लहानपणापासून शाकाहारी आहे. परंतु त्याच्या डाएट प्लॅनमध्ये अंड्यांचा समावेश असतो.

शिखर धवन हा देखील पूर्वी मांसाहार करायचा. परंतु त्यानंतर तो स्वतःहून शाकाहारी खाण्याकडे वळला.

युजवेंद्र चहल देखील मागील काही वर्षांपासून केवळ शाकाहारी खाण्याचे सेवन करतो.