JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : रिषभ पंतची जर्सी डगआउटमध्ये टांगण्यावर बीसीसीआयचा आक्षेप, काय आहे कारण?

IPL 2023 : रिषभ पंतची जर्सी डगआउटमध्ये टांगण्यावर बीसीसीआयचा आक्षेप, काय आहे कारण?

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जाएंट्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात गुजरातने दिल्लीला त्यांच्या होम ग्राउंडवर पराभूत केले. सामन्यादरम्यान दिल्ली कॅपिटल्सने केलेल्या एका कृतीवर बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने आक्षेप व्यक्त केला आहे.

जाहिरात

काजोल आणि अजय देवगण हे बॉलिवूडमधील परफेक्ट कपल

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 एप्रिल : जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेला सुरुवात झाली असून यामुळे क्रिकेट विश्वात उत्साहाचे वातावरण आहे. काल आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात गुजरातने दिल्लीला त्यांच्या होम ग्राउंडवर पराभूत केले. सामन्यादरम्यान दिल्ली कॅपिटल्सने केलेल्या एका कृतीवर बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने आक्षेप व्यक्त केला आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आयपीएल 2023 चा सातवा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पारपडला. हा सामना पाहण्यासाठी सध्या दुखापतीग्रस्त असलेला दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार रिषभ पंत उपस्थित होता. परंतु होम ग्राऊंडवरील पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा गुजरातकडून दारुण पराभव झाला. रिषभ पंतचा मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अपघात झाल्याने तो सध्या दुखापतीतून पूर्णतः सावरलेला नाही. या दुखापतीमुळे तो यंदाच्या आयपीएला देखील मुकला आहे. त्यामुळे रिषभच्या अनुपस्थितीत त्याची आठवण म्हणून दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या सामन्यात त्यांच्या डग आउटमध्ये रिषभची जर्सी टांगून ठेवली होती.

दिल्ली कॅपिटल्सच्या या कृतीमुळे रिषभचे चाहते आनंदीत झाले असले तरी बीसीसीआयच्या एक अधिकाऱ्याने यावर आक्षेप घेऊन नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हंटले, हे थोडेसे जास्त होत आहे, जेव्हा एखादी मोठी घटना किंवा मोठी दुर्घटना घडली असेल किंवा एखादा खेळाडू निवृत्त झाला असेल तेव्हा अशा प्रकारची वर्तवणूक केली जाते. परंतु या प्रकरणात असे नाही रिषभ पंत पूर्णपणे ठीक आहे. अपेक्षेपेक्षा वेगाने दुखापतीतून बाहेर पडत आहे. संबंधित कृती करण्यामागचा संघाचा उद्देश जरी चांगला असला तरी फ्रँचायझींनी नम्रपणे भविष्यात अशा प्रकारची कृती करू नये.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या