JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / कार्तिक-इशान नाही, सेहवागने T20 World Cup साठी केली या विकेट कीपरची निवड!

कार्तिक-इशान नाही, सेहवागने T20 World Cup साठी केली या विकेट कीपरची निवड!

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबीकडून खेळणाऱ्या दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) विस्फोटक बॅटिंग केली आहे, याचसोबत त्याने टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) टीम इंडियात कमबॅक करण्यासाठीचा आपला दावा आणखी मजबूत केला आहे, तर दुसरीकडे मागच्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळलेला इशान किशन (Ishan Kishan) खराब फॉर्ममध्ये आहे.

जाहिरात

virender sehwag

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबीकडून खेळणाऱ्या दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) विस्फोटक बॅटिंग केली आहे, याचसोबत त्याने टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) टीम इंडियात कमबॅक करण्यासाठीचा आपला दावा आणखी मजबूत केला आहे, तर दुसरीकडे मागच्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळलेला इशान किशन (Ishan Kishan) खराब फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) ऋषभ पंतसोबत दुसरा विकेट कीपर कोण असणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) जितेश शर्मा (Jitesh Sharma) याची निवड करावी, अशी मागणी केली आहे. पंजाब किंग्सकडून (Punjab Kings) खेळणाऱ्या जितेश शर्माने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात फिनिशरची भूमिका चोख बजावली. जितेशने 18 बॉलमध्ये नाबाद 38 रन केले. क्रिकबझसोबत बोलताना सेहवाग म्हणाला, ‘जितेश शर्माने प्रभावित केलं आहे. जो रन करतो त्याला वर्ल्ड कपसाठीच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत ठेवावं. त्याच्या खेळाने मी प्रभावित झालो आहे. मी जर निवड समितीमध्ये असतो तर त्याला दुसरा विकेट कीपर म्हणून टी-20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला घेऊन गेलो असतो.’ इशान किशन, दिनेश कार्तिक आणि संजू सॅमसन टीम इंडियामध्ये कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पण सेहवागने जितेश शर्माचं नाव घेतलं. ‘इशान किशन, ऋषभ पंत आणि ऋद्धीमान साहा हे विकेट कीपर-बॅटर आहेत, पण या सगळ्यांमध्ये मला जितेश शर्माने प्रभावित केलं आहे. तो न घाबरता बॅटिंग करतो आणि आपले शॉट मारतो. कोणता बॉल कव्हरवरून आणि कोणता बॉल मिड-ऑफ, मिड-ऑन वरून खेळायचा हे त्याला माहिती आहे,’ अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली. आयपीएल लिलावात जितेश शर्माला पंजाब किंग्सने 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं. आयपीएल 2022 च्या 7 सामन्यांमध्ये त्याने 167.01 च्या स्ट्राईक रेटने 162 रन केले आहेत, यात तो 2 वेळा नाबादही राहिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या