JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : कोण असणार टीम इंडियाचा भविष्यातला कॅप्टन? रवी शास्त्रींनी सांगितली 3 नावं

IPL 2022 : कोण असणार टीम इंडियाचा भविष्यातला कॅप्टन? रवी शास्त्रींनी सांगितली 3 नावं

टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) आयपीएल 2022 (IPL 2022) मधून पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये कमबॅक करत आहेत, त्याआधी त्यांनी टीम इंडियाच्या भविष्याबाबत महत्त्वाचं भाकीत केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 मार्च : टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) आयपीएल 2022 (IPL 2022) मधून पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये कमबॅक करत आहेत, त्याआधी त्यांनी टीम इंडियाच्या भविष्याबाबत महत्त्वाचं भाकीत केलं आहे. आयपीएलचा हा मोसम अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यातूनच भविष्यातला कर्णधार सापडू शकतो, असं शास्त्रींना वाटतंय. आयपीएलच्या या मोसमात ऋषभ पंत (Rishabh Pant), केएल राहुल (KL Rahul) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या भारतीय कर्णधारांना आपलं नेतृत्व दाखवण्याची संधी आहे, असं शास्त्री म्हणाले. तसंच त्यांनी सध्याचा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याचंही कौतुक केलं. आयपीएल 2022 ला 26 मार्चपासून सुरूवात होणार आहे. यावेळी मैदानात एकूण 10 टीम उतरणार आहेत. लखनऊ सुपर जाएंट्स आणि गुजरात टायटन्स यांना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. ‘विराट कोहली (Virat Kohli) आता कर्णधार नाही, पण रोहित शर्मा (Rohit Sharma) पांढऱ्या बॉलच्या क्रिकेटमध्ये उत्कृष्ट राहिला आहे. भविष्यात टीम इंडियाचं नेतृत्व कोण करेल, हे भारत बघेल. या रेसमध्ये श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि केएल राहुल आहेत. भारतीय टीमला भविष्यासाठी एक मजबूत कर्णधार शोधावा लागणार आहे, इकडे ही संधी आहे,’ असं शास्त्री आयपीएल प्रसारणकर्ता स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात म्हणाले. ‘मागच्या आयपीएलमध्ये आपण व्यंकटेश अय्यरला बघितलं, याआधी कोणीही त्याच्याबाबत ऐकलं नव्हतं, पण जेव्हा आयपीएल संपली तेव्हा तो भारतीय टीममध्ये आला. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) बॉलिंग करणार का नाही यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे, पण संपूर्ण देश पांड्याच्या प्रत्येक पावलावर नजर ठेवून असेल,’ अशी प्रतिक्रिया शास्त्रींनी दिली. पांड्या यंदा गुजरात टायटन्सकडून खेळणार आहे. गुजरातने पांड्याला कर्णधार केलं आहे. आयपीएलच्या या मोसमात फास्ट बॉलर्सवर जास्त लक्ष दिलं जाईल, कारण ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणारा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) ऑस्ट्रेलियात आहे. ऑस्ट्रेलियातल्या खेळपट्ट्या फास्ट बॉलरना अनुकूल आहेत, असं मत शास्त्रींनी व्यक्त केलं. आयपीएलच्या 15 व्या मोसमाला शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधून सुरूवात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात पहिला सामना होणार आहे. आयपीएलची फायनल 29 मे रोजी खेळवली जाणार आहे. 7 वर्षांनंतर रवी शास्त्री यांचं कॉमेंट्री बॉक्समध्ये पुनरागमन होत आहे. मागच्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कप पर्यंत शास्त्री टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या