मुंबई, 8 मे : राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) धडाकेबाज फलंदाज शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) आयपीएल 2022 च्या मध्यात त्याच्या संघाला सोडून गेला आहे. त्याने एक दिवस आधी राजस्थानला पंजाब किंग्जविरुद्ध जोरदार विजय मिळवून दिला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वेस्ट इंडिजला जाणारे विमान पकडून तो मायदेशी गेला. पंजाबविरुद्धच्या सामन्यात 190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हेटमायरने 193 च्या स्ट्राइक रेटने 16 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. हेटमायरने या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार मारले. म्हणजेच 24 धावा फक्त चौकाराने जमवल्या आहेत. मग असं काय घडलं की हेटमायरला अचानक घरी परतावे लागले. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर कॅरेबियन फलंदाजाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याच्या घरी परतण्याचे कारण समोर आले आहे. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या ट्विटमध्ये सांगितले की शिमरॉन हेटमायर आज सकाळी त्याच्या घरी गयानाला रवाना झाला आहे. पहिल्या मुलाच्या जन्मासाठी तो घरी परतला आहे. पण, तो लवकरच संघात सामील होणार आहे. व्हिडिओमध्ये, हेटमायरने आपलं मनोगत व्यक्त केलं. तो म्हणाला की, मूल एकदाच जन्माला येतं आणि मी पहिल्यांदाच बाप होणार आहे. म्हणूनच मी घरी परतत आहे. माझे सर्व सामान इथं आहे. मला मिस करू नका, मी लवकरच परत येईन. व्हिडिओमध्ये, सहकारी खेळाडू युझवेंद्र चहल, जेम्स नीशम, रसी व्हॅन डर डुसेन त्याला निरोप देताना दिसत आहे.
हेटमायर मॅच फिनिशरची भूमिका चोख बजावतो हेटमायर भारतात कधी परतणार याची माहिती राजस्थान रॉयल्सने दिली आहे. फ्रँचायझीने सांगितले की बाप झाल्यानंतर हेटमायर मुंबईला परतेल आणि संघात सामील होईल. हेटमायरने या हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी मॅच फिनिशरची भूमिका बजावली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांमध्ये 72.75 च्या सरासरीने 291 धावा केल्या आहेत. त्याने केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. मात्र, 7 सामन्यांत तो नाबाद राहिला आहे. यावरून या मोसमात राजस्थानच्या यशात या कॅरेबियन खेळाडूचा किती मोठा हात आहे याची कल्पना येते. Ravindra Jadeja IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रवींद्र जडेजा संघाबाहेर का? MS धोनीने सांगितलं कारण राजस्थान फ्रँचायझीनेही दिल्या शुभेच्छा वास्तविक, शिमरॉन हेटमायर पहिल्यांदाच बाप होणार आहे. राजस्थान फ्रँचायझीने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आणि म्हटले की, ‘आम्ही त्याला (हेटमायर) सर्वतोपरी मदत करू. त्याच्या आणि पत्नीच्या येणाऱ्या बाळाला आमच्या शुभेच्छा आहेत. तो पुन्हा मुंबईत परतेल आणि आयपीएल 2022 हंगामात त्याचे उर्वरित सामने खेळेल अशी आमची अपेक्षा आहे. यावेळी तू बाप म्हणून परतशील. आम्ही तुमची वाट पाहू. राजस्थान संघाने हा सामना 6 गडी राखून जिंकला राजस्थान संघ पंजाब किंग्ज विरुद्ध शेवटचा सामना खेळला, ज्यामध्ये पंजाब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 5 विकेट गमावत 189 धावा केल्या. इंग्लिश फलंदाज जॉनी बेअरस्टोने 40 चेंडूत 56 धावा केल्या. तर जितेश शर्माने 18 चेंडूत 38 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघाने 4 बाद 190 धावा करत सामना जिंकला. यशस्वी जैस्वालने 41 चेंडूत 68 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले.