Photo-Gujarat Titans
पुणे, 2 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) गुजरात टायटन्सने (Gujarat Titans vs Delhi Capitals) लागोपाठ दुसरा विजय नोंदवला आहे. लॉकी फर्ग्युसनच्या (Lockie Ferguson) भेदक बॉलिंगपुढे दिल्लीची बॅटिंग गडगडली. गुजरातने दिलेल्या 172 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 157/9 पर्यंत मजल मारता आली. लॉकी फर्ग्युसनने 4 ओव्हरमध्ये 28 रन देऊन 4 विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमीला 2 आणि हार्दिक पांड्या, राशिद खानला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. दिल्लीकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 43 रन केले. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर गुजरातने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 171 रन केले. शुभमन गिलने 46 बॉलमध्ये 84 रनची खेळी केली, यात त्याने 6 फोर आणि 4 सिक्स मारले. दिल्लीकडून मुस्तफिजुर अहमदला 3, खलील अहमदला 2 आणि कुलदीप यादवला 1 विकेट मिळाली. दिल्लीविरुद्धच्या या विजयासह गुजरातची टीम पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थान रॉयल्सनेही 2 पैकी 2 मॅच जिंकल्या आहेत, पण त्यांचा नेट रन रेट गुजरातपेक्षा चांगला आहे, तसंच केकेआरनेही 3 पैकी त्यांच्या 2 मॅच जिंकल्यामुळे ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2 पैकी 1 मॅच जिंकणारी दिल्ली चौथ्या क्रमांकावर आहे.