JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : 'BCCI चा तो नियम मूर्खपणाचा', नवी इनिंग सुरू होताच शास्त्रींचा सिक्सर

IPL 2022 : 'BCCI चा तो नियम मूर्खपणाचा', नवी इनिंग सुरू होताच शास्त्रींचा सिक्सर

टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) आता नव्या इनिंगसाठी सज्ज झाले आहेत. ते यंदाच्या आयपीएल स्पर्धेत हिंदीमध्ये कॉमेंट्री करणार आहेत. ही इनिंग सुरू होण्यापूर्वी त्यांनी बीसीसीआयवर टीका केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 मार्च : टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) आता नव्या इनिंगसाठी सज्ज झाले आहेत. ते यंदाच्या आयपीएल स्पर्धेत हिंदीमध्ये कॉमेंट्री करणार आहेत. शास्त्री यांना कॉमेंट्री क्षेत्र नवं नाही, पण त्यांनी यापूर्वी इंग्रजीमधून कॉमेंट्री केली आहे. आता आगामी आयपीएलमध्ये ते पहिल्यांदाच हिंदीमधून कॉमेंट्री करणार आहेत. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) देखील त्यांच्यासोबत कॉमेंट्री टीममध्ये असेल. आयपीएलचे अधिकृत ब्रॉडकास्टर असलेल्या ‘स्टार स्पोर्ट्स’नं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रवी शास्त्री यांनी बीसीसीआयवर टीका केली आहे. बीसीसीआयच्या घटनेतील ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’ (Conflict of Interest Clause) हे कलम मूर्खपणाचे आहे, अशी टीका शास्त्री यांनी केली. आयपीएलचा हा 15 वा सिझन आहे. मी 11 वर्ष कॉमेंट्री केली आहे. पण, बीसीसीआयच्या या मुर्खासारख्या नियमामुळे मी गेली 5 वर्ष ते करू शकलो नाही,’ या शब्दात शास्त्रींनी बीसीसीआयवर टीका केली. माईकच्या मागे राहून कॉमेंट्री करणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. रवी शास्त्रींनी यावेळी त्यांचा नवा सहकारी सुरेश रैनाचं स्वागत केलं. ‘सुरेश रैना हा खऱ्या अर्थाने मिस्टर आयपीएल आहे. आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या सिझनपासून एकाच टीमकडून सातत्याने चांगली कामगिरी करण्याचं अवघड काम रैनानं केलं आहे. आयपीएल स्पर्धेतील सर्वाधिक रन करणाऱ्या बॅटर्समध्ये त्याचा समावेश आहे,’ असं शास्त्री यावेळी म्हणाले. IPL 2022 : विराट कोहली पुन्हा होणार RCB चा कॅप्टन, टीम इंडियाच्या खेळाडूचा दावा आयपीएलचा हा सिझन अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यातूनच भविष्यातला कर्णधार सापडू शकतो, असं शास्त्रींना वाटतंय. आयपीएलच्या या मोसमात ऋषभ पंत (Rishabh Pant), केएल राहुल (KL Rahul) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या भारतीय कर्णधारांना आपलं नेतृत्व दाखवण्याची संधी आहे, असं शास्त्री म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या