JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022: एकेकाळी शूज खरेदीसाठीही पैसे नव्हते, पण आता आयपीएल गाजवण्यासाठी 'हा' क्रिकेटर सज्ज

IPL 2022: एकेकाळी शूज खरेदीसाठीही पैसे नव्हते, पण आता आयपीएल गाजवण्यासाठी 'हा' क्रिकेटर सज्ज

मुरेवा हा तसा मागासलेला आणि विकासापासून वंचित असलेला भाग आहे. या भागात शेतीशिवाय अन्य काही होत नाही. त्यामुळे त्याचं कुटुंब हरारेमधल्या (Harare) दाट लोकवस्ती असलेल्या हायफिल्ड या उपनगरात स्थलांतरित झालं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 मार्च : प्रत्येक माणूस विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम करत असतो. योग्य मार्गदर्शन, संधी आणि नशिबाची साथ मिळाली तर त्याच्या परिश्रमाचं सोनं होतं. क्रिकेट जगतात अशा पद्धतीनं यश मिळावलेले अनेक क्रिकेटर्स (Cricketer) आहेत. या क्रिकेटर्सच्या यादीत आता ब्लेसिंग मुझरबानी (Blessing Muzarabani) या क्रिकेटरचं नाव समाविष्ट झालं आहे. ब्लेसिंग हा झिम्बाब्वेचा (Zimbabwe) फास्ट बॉलर आहे. ‘आयपीएल’च्या लखनौ सुपर जायंट्स टीममध्ये त्याचा समावेश झाला आहे. फास्ट बॉलर (Fast Bowler) म्हणून ब्लेसिंगची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सीरिजमध्ये ब्लेसिंग सर्वांत प्रभावी बॉलर ठरला होता. पाकिस्तानचा (Pakistan) दिग्गज बॅट्समन बाबर आझमने ब्लेसिंगच्या बॉलिंगपुढे अक्षरशः शरणागती पत्करल्याचं चित्र होतं. मुझरबानीने आझमला तीन वेळा आउट केलं होतं. अशा प्रकारे कामगिरी करणाऱ्या ब्लेसिंगला हे यश सहजासहजी मिळालेलं नाही. त्याने वैयक्तिक आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीचा सामना केला आहे. त्याच्या संघर्षाची कहाणी केवळ नवोदित क्रिकेटर्सनाच नाही, तर सर्वसामान्यांनाही प्रेरणा देणारी आहे. ‘ क्रिकेटएनमोअर डॉट कॉम ’ने याविषयीची माहिती दिली आहे. फास्ट बॉलर ब्लेसिंग मुझरबानी आता ‘आयपीएल’च्या लखनऊ सुपर जायंट्स टीमकडून मैदानात उतरत आहे. आठ वर्षांनंतर झिम्बाब्वेचा क्रिकेटर ‘आयपीएल’मध्ये सहभागी होत आहे. ब्लेसिंगनं प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत हे यश मिळवलं आहे. 25 वर्षांच्या ब्लेसिंगचा जन्म दहा हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या मुरेवा (Mureva) या मोझांबिक सीमेलगतच्या शहरात झाला. 6 फूट 6 इंच उंची असलेल्या ब्लेसिंगने क्रिकेटमध्ये नशीब आजमावण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्यासाठी खूप परिश्रम घेतले. मुरेवा हा तसा मागासलेला आणि विकासापासून वंचित असलेला भाग आहे. या भागात शेतीशिवाय अन्य काही होत नाही. त्यामुळे त्याचं कुटुंब हरारेमधल्या (Harare) दाट लोकवस्ती असलेल्या हायफिल्ड या उपनगरात स्थलांतरित झालं. हे असं ठिकाण आहे, की जिथून मागच्या पिढीतले काही सर्वोत्तम क्रिकेटपटू उदयास आले. यात प्रामुख्यानं हॅमिल्टन मासाकाद्झा, तातेंदा तैबू, वुसी सिबांडा आणि एल्टन चिगुम्बुरा यांचा समावेश आहे. ब्लेसिंग मुझरबानी हा चांगल्या संधीच्या शोधात देश सोडणाऱ्या झिम्बाब्वेच्या अन्य क्रिकेटर्ससारखा नव्हता. कोलपॅक करारापूर्वी तो केवळ 14 वन डे मॅचेस खेळला होता. हिथ स्ट्रिकनंतर तो झिम्बाब्वेचा सर्वांत फास्ट बॉलर म्हणून उदयास आला होता. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना ब्लेसिंगनं सांगितलं, ‘मला इतर मुलांइतका विशेषाधिकार मिळाला नाही. अन्य मुलांना क्रिकेटचं चांगलं ग्राउंड उपलब्ध होतं आणि खेळण्यासाठी बरेच मित्र होते. मला ट्रेनिंग घ्यायचं होतं तेव्हा मला मोबाइल फोन किंवा चांगले बूटही घेता आले नाहीत. मला बॉलिंगची संधी मिळते का हे पाहण्यासाठी फक्त मी हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये गेलो होते. खेळाबद्दल कमालीची उत्सुकता असल्यानेच मी तेथे गेलो.’ ‘श्रीमंत मुलं आणि गरीब मुलांना कधीकधी एकत्र जेवण दिलं जातं, या स्थितीत पहिल्यांदा राहणं माझ्यासाठी खरोखर कठीण होतं. जेव्हा श्रीमंत मुलांचे शूज पाहून तुम्हालाही तसे शूज हवे असतात, पण तुमच्याकडे ते खरेदी करण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नसतो. अशा गोष्टींचा लहानपणी तुमच्यावर खूप परिणाम होतो. अशा अनेक छोट्या गोष्टी असतात, की ज्या तुम्हाला कधीकधी अस्वस्थ करू शकतात; पण खेळावरचं तुमचं प्रेम हाच जगण्याचा एकमेव मार्ग तुमच्यासमोर असतो,’ असं ब्लेसिंगनं सांगितलं. ‘आम्ही वर्ल्डकपसाठी पात्र झालो असतो तर मी कोलपॅकच्या मार्गावर गेलो असतो की नाही हे सांगणं कठीण आहे. लहानपणी बॉल मूव्ह कसा करायचा, गुड लेंग्थमध्ये बॉलिंग कशी करायची या गोष्टी शिकण्यासाठी आपण इंग्लंडला (England) जाऊन काउंटी क्रिकेट (County Cricket) खेळावं असं मला वाटायचं. जेव्हा मी इंटरनॅशनल क्रिकेट खेळत होतो, तेव्हा मी फुल बॉलिंग करण्यासाठी धडपडत होतो. काउंटी क्रिकेट खेळणं हा बॉलिंग सुधारण्याचा, शिकण्याचा आणि चांगला क्रिकेटर बनण्याचा एकमेव मार्ग आहे. ब्रेक्झिट झालं नसतं, तर मी माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी परत येण्यापूर्वी माझा तीन वर्षांचा करार पूर्ण केला असता. कारण मला सर्वोत्तम खेळाडू व्हायचं होतं,’ असं ब्लेसिंग नमूद करतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या