रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) एकमेकांशी दोन हात करणार आहे. दोन्ही संघानी या हंगामात एक सामना गमावला आहे तर एका सामन्यात विजय मिळवला आहे.
नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : माजी इंग्लिश कर्णधार नासिर हुसेन (Nasser Hussain) यांनी त्यांच्या आयपीएल संघात कोणते खेळाडू असतील हे सांगितले. दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यातील सामना मुंबईने 5 विकेटनं जिंकला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मुंबईनं जिंकलेले हे पाचवे विजेतेपद आहे. मात्र असे असले तरी नासिर हुसेन यांनी त्यांच्या आयपीएल संघात रोहितला जागा दिली नाही आहे. नासिर हुसेन यांनी त्यांच्या आयपीएल प्लेइंग इलेव्हनमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनाही वगळलं आहे. याआधी सेहवागनंही रोहितच्या ऐवजी त्याच्या आयपीएल संघात विराटकडे संघाचे कर्णधारपद दिले होते. मात्र नासिर यांनी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार केएल राहुलला आपल्या संघाचं नेतृत्व दिलं आहे. वाचा- BREAKING: क्रिकेटपटू क्रुणाल पांड्याला मुंबईत घेतलं ताब्यात, हे कारण आलं समोर केएल राहुलनं या हंगामात जबरदस्त फलंदाजी केली. सर्वात जास्त धावा करणारा फलंदाजही ठरलाय तर तिसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवची निवड केली आहे. चौथ्या क्रमांकावर इशान किशान आहे. नासिर यांनी विकेटकीपर फलंदाज म्हणून एबी डिव्हिलिअर्सची निवड केली आहेय अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्याला घेतलं आहे. तर गोलंदाजीमध्ये जोफ्रा आर्चर, राशिद खान, कगिसो रबाडा, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांची निवड केली आहे. वाचा- ‘विराट आणि पॉंटिंगमध्ये झाली होती बाचाबाची’, अश्विननं सांगितलं नेमकं काय घडलं नासिर हुसेन यांची IPL टीम: केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, एबी डिव्हिलिअर्स (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, जोफ्रा आर्चर, राशिद खान, कगिसो रबाडा, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.