भारतीय संघात सलामीला खेळणारा कर्णधार रोहित शर्मा आयपीएलमध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर खेळतो. हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या आणि पोलार्ड हे मधल्या फळीत फलंदाजी करतात. सलामीला क्विंटन डी कॉक आणि इविन लुइस यांच्यासह एक भारतीय खेळाडू उतरू शकतो. यात युवराज सिंग आणि पंकज जयस्वालही संघाची ताकद ठरू शकतात. फिरकीपटू मयंक मार्कंडेयचे प्रदर्शन पाहण्यासारखे असेल.
मुंबई, 15 नोव्हेंबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सर्व संघ जय्यत तयारी करत आहेत. पुढच्या वर्षी होणाऱ्या स्पर्धेसाठी डिसेंबरमध्ये खेळाडूंचा लिलाव करण्यात येणार आहे. त्याआधी सध्या ऑफ सीझन ट्रेड विंडो सुरू करण्यात आली आहे. यात काही खेळाडूंना रिलीज करण्यात आले आहे. दरम्यान तीन वेळा विजेतेपद मिळालेल्या मुंबई इंडियन्स संघानं काही खेळाडूंना रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी मुंबई इंडियन्सनं न्यूझीलंड संघाचा जलद गोलंदाज ट्रेंट बोल्टला आपल्या संघात सामिल केले आहे. गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या बोल्टला रिलीज केल्यानंतर मुंबईनं संघात घेतले. आता मुंबईकर सिध्देश लाडला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. सिध्देश लाड पुढच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणार आहे.
वाचा- मुंबईकर खेळाडू आता होणार दिल्लीकर! 9 वर्षांनंतर घेतला मोठा निर्णय तर, राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा धवल कुलकर्णीला पुन्हा मुंबई संघात स्थान देण्यात आले. सुरुवातीच्या हंगामात धवल मुंबई इंडियन्सकडून खेळत होता.
वाचा- IPL 2020साठी मुंबई इंडियन्स सज्ज, रोहितला मिळणार ‘या’ चॅम्पियन खेळाडूची साथ! सिध्देश 2015पासून मुंबई इंडियन्स संघामध्ये आहे. दरम्यान 4 वर्षांनंतर यावर्षी झालेल्या 12व्या हंगामात त्याला पहिल्यांदा संधी मिळी होती. सिध्देश लाडला ज्यावेळी संघात जागा दिली त्याचवेळी हार्दिक पांड्यालाही संघात घेण्यात आले होते. एकीएकडं हार्दिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करत आहे तर, सिध्देश लाडची हवा आहे ती प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये. 23 मे 1992ला मुंबईच जन्म झालेल्या सिध्देशला जणु बालवयातचं क्रिकेटचे बाळकडू मिळाले. कारण त्याचे बाबा दिनेश लाड हे मुंबई रणजी क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक त्यामुळं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणी प्रमाणं सिध्देशनं क्रिकेटचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. 2013पासून सिद्धेश प्रथम श्रेणीत मुंबई संघाकडून खेळत आहे. 2015मध्ये सिद्घेशला मुंबई इंडियन्स संघाने विकत घेतले होते. सिद्धेशनं आतापर्यंत मुंबईला बरेच रणजी सामने जिंकवून दिले आहे. त्याचबरोबर सिद्धेशकडे मुंबईच्या रणजी संघाचे नेतृत्वही आहे. सिद्धेशनं 2017-18 रणजी करंडकमध्ये सर्वात जास्त धावा केल्या होत्या. वाचा- धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जनं घेतला मोठा निर्णय, या 3 स्टार खेळाडूंना दिला डच्चू आयपीएलच्या लिलावात संघाकडे आहेत इतके पैसे दिल्ली कॅपिटल्स – 7.7 कोटी राजस्थान रॉयल्स – 7.15 कोटी रुपये कोलकाता नाइट राइडर्स – 6.05 कोटी रुपये सनराइजर्स हैदराबाद – 5.30 कोटी रुपये किंग्स इलेवन पंजाब – 3.7 कोटी रुपये मुंबई इंडियन्स – 3.55 कोटी रुपये चेन्नई सुपर किंग्स – 3.2 कोटी रुपये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – 1.80 कोटी रुपये वाचा- मयंक अग्रवाल नॉनस्टॉप! विराटलाही नाही जमलं त्या खेळाडूशी घेतला पंगा सर्वाधिक विजेतेपद मुंबईकडे आयपीएलमध्ये यावर्षी चेन्नईचा पराभव करून मुंबईने विजेतपद मिळवले. आयपीएलच्या 12 हंगामात मुंबईने सर्वाधिक 4 विजेतेपद मिळवले आहेत. तर धोनीच्या संघाने 3 वेळा विजेतेपद मिळवले आहे. कोलकाता संघाने दोन वेळा तर हैदराबाद डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स यांनी प्रत्येकी एक वेळा विजेतेपद मिळवले आहे. यंदाचा आयपीएलचा अंतिम सामना 18.6 मिलियन लोकांनी पाहिला होता. तर जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नात 20 टक्क्यांनी फायदा झाला आहे.