नवी दिल्ली, 27 जानेवारी : आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सर्वच चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. तर, दुसरीकडे आयपीएलमध्ये नवनवीन बदल करण्यात येत आहेत. याआधी नो-बॉलच्या नियमांमध्ये केलेल्या बदलानंतर आता आणखी एक नियम बदलण्यात येणार आहे. इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) गव्हर्निंग काउन्सिल आगामी सत्रातील सामन्यांच्या वेळेत बदल करण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता सामने रात्री 8 ऐवजी 7.30 वाजता सुरू करण्याची शक्यता आहे. आज राजधानी याबाबत बैठकीत निर्णय घेतला जाईल. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्यासह बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकार्यांच्या तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीचे (सीएसी) अंतिम निर्णय घेईल. वाचा- हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये दिग्गज बॉस्केटबॉलपटूसह 13 वर्षांच्या लेकीचा मृत्यू! आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक माजी कसोटी फलंदाज ब्रिजेश पटेल यांच्या अध्यक्षतेखालील आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची (आयपीएल) दुसरी बैठक होणार असून यामध्ये 2020च्या आयपीएलच्या वेळापत्रकाबाबत मोठा निर्णय घेतला जाईल. लोढा समितीच्या शिफारशीनुसार आयपीएल फायनल आणि भारताच्या पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान 15 दिवसांची अंतर आवश्यक आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ सदस्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर पीटीआयला, ‘प्रसारणकर्त्यांना सामने लवकर सुरू व्हावेत अशी इच्छा आहे आणि आठवड्याच्या शेवटी दोन सामने नाही झाले पाहिजेत. या विषयावर चर्चा केली जाईल. गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत संपूर्ण वेळापत्रकात चर्चा होण्याची शक्यता आहे’, अशी माहिती दिली. वाचा- न्यूझीलंडच्या खेळाडूने चहलला दिली शिवी, रोहित शर्मावर आली पळून जाण्याची वेळ गुवाहाटीचा मुद्दादेखील महत्त्वाचा गुवाहाटीतील बरसपारा स्टेडियमवर आयपीएलच्या मैदानावरील पदार्पणाचा आणखी एक मुद्दा म्हणजे राजस्थान रॉयल्सचा दुसरा होम ग्राउंड असेल. त्याशिवा 2021च्या मोसमात संघांच्या संख्येवरही चर्चा होऊ शकते. आणखी दोन फ्रँचायझी जोडून आयपीएलला दहा संघांची लीग बनविण्याची मागणी आहे आणि दोन महिन्यांहून अधिक काळ ते चालवित आहेत. वाचा- ‘केएल राहुलचं यष्टीरक्षण संघाला महागात पडणार, धोनीचं मौन समजण्यापलिकडे’