JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / असा आहे विराटचा रिटायरमेंट प्लॅन! करणार कधीही न केलेले काम

असा आहे विराटचा रिटायरमेंट प्लॅन! करणार कधीही न केलेले काम

क्रिकेट सोडल्यानंतर विराट करणार हे काम, वाचून तुम्हालाही बसेल धक्का.

जाहिरात

विराट कोहली सोशल मीडियावर सगळ्यात जास्त फॉलोअर असणारा खेळाडू आहे. विराट कोहलीचे फेसबूक, इन्स्टाग्रामवर 3 कोटी फॉलोअर आहेत. या यादीत विराट भारतीय खेळाडूंमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानं पुन्हा एकदा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका होत आहे. मात्र या मालिकेत विराटचा विश्रांती देत रोहित शर्माकडे कर्णधारपद देण्यात आले आहे. त्यामुळं विराट सध्या पत्नी अनुष्का शर्मासोबत वेळ घालवत होता. काही दिवसांपूर्वी विराट अनुष्कासोबत भुटान दौऱ्यावर होता. दरम्यान आता विराट पुन्हा भारतात आला आहे. भारतात येताच विराटनं आपला रिटायरमेंट प्लॅन जाहीर केला आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत विराटनं हे गुपित सांगितले. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या आपल्या क्रिकेट करिअरच्या सर्वोच्च स्थानी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावांची टप्पा पार करणाऱ्या विराटच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. यात सर्वात जास्त योगदान आहे ते विराटच्या फिटनेसचे. विराट रोज जिममध्ये घाम गाळतो, तेवढाच तो डायटही फॉलो करतो. त्यामुळं दिल्लीकर विराटला फिट राहण्यासाठी खुप मेहनत करावी लागते. वाचा- वय 15 वर्ष 258 दिवस, सामने फक्त 5 आणि मोडला सचिनचा 30 वर्षांपूर्वीचा विक्रम! मात्र विराटनं नुकत्याच एका मुलाखतीत क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर काय करणार हे सांगितले. विराट निवृत्तीनंतर जेवण कसे बनवायचे हे शिकणार आहे. विराटनं या मुलाखतीत, “माझ्या खाण्यापिण्यात गेल्या काही वर्षांमध्ये फार बदल झाला आहे. असे असले तरी मी आजही फुडी आहे, मला खाण्याची आवड आहे. मी राजमा, चिकन, पंजाबी नान हे सगळं खाऊनच मोठा झालो आहे. पण मला जेवण बनवता येत नाही. त्यामुळं निवृत्तीनंतर नक्कीच मी जेवण बनवण्याचा प्रयत्न करेन”, असे सांगितले. वाचा- दिग्गज क्रिकेटपटूच्या 4 वर्षांच्या लेकीला लागले ‘विराट’ होण्याचे वेध! पाहा VIDEO विराट सध्या क्रिकेटपासून दूर असला तरी, 14 नोव्हेंबरपासून भारत-बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेत तो संघासोबत असणार आहे. भारत-बांगलादेश यांच्यात 14 नोव्हेंबरपासून इंदूर येथे दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. यातील दुसरा कसोटी सामना हा इडन गार्डन येथे होणार असून भारतात पहिल्यांदाच डे-नाइट सामना होणार आहे. वाचा- वर्ल्ड कप फायनलनंतर इंग्लड-न्यूझीलंड सामना पुन्हा टाय, या संघाची सरशी लहानपणापासून विराट फुडी विराटनं नुकतेच आपल्या पत्नीसमवेत विगन होण्याचा निर्णय घेतला. मात्र लहानपणापासून विराट फुडी आहे. विराटनं एका मुलाखतीत, “मला नवीन नवीन पदार्थ खायला आवडतात. मी जेव्हा फिरायला सुरुवात केली तेव्हा मला वेगवेगळी चव कळायला लागली. त्यामुळं मला जेवण खायला आणि बनवायला आवडते”, असे सांगितले. तसेच, “मी जेवण बनवत नाही पण मला चव कळते”,असेही सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या