JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये अचानक पोहोचला लिजंड, धवनने मारली मिठी, VIDEO

टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये अचानक पोहोचला लिजंड, धवनने मारली मिठी, VIDEO

टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजच्या (India vs West Indies) दौऱ्यावर आहे. तीन वनडे मॅचच्या सीरिजची पहिली वनडे भारताने 3 रनने जिंकली, ज्यामुळे टीमने सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली. या विजयानंतर टीम इंडियाचे खेळाडू उत्साही दिसले, पण एका महान क्रिकेटपटूने टीमचा आनंद दुप्पट केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जुलै : टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजच्या (India vs West Indies) दौऱ्यावर आहे. तीन वनडे मॅचच्या सीरिजची पहिली वनडे भारताने 3 रनने जिंकली, ज्यामुळे टीमने सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली. या विजयानंतर टीम इंडियाचे खेळाडू उत्साही दिसले, पण एका महान क्रिकेटपटूने टीमचा आनंद दुप्पट केला. हा लिजंड वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लारा (Brian Lara) आहे. लाराने टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये अचानक हजेरी लावली. बीसीसीआयने लाराचा टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भेटण्यासाठी कोण आलं आहे पाहा? हा लिजंड ब्रायन चार्ल्स लारा आहे, असं कॅप्शन बीसीसीआयने या व्हिडिओला दिलं आहे.

लाराचं स्वागत युझवेंद्र चहल, टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवन आणि श्रेयस अय्यरने केलं. यानंतर लाराने टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचीही (Rahul Dravid) भेट घेतली. याचा फोटोही बीसीसीआयने शेअर केला आहे. एका फ्रेममध्ये दोन लिजंड्स असं कॅप्शन बीसीसीआयने फोटोला दिलं.

टीम इंडियाचा रोमांचक विजय वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाने टॉस हरल्यानंतर पहिले बॅटिंग केली, यानंतर त्यांना 50 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 308 रन करता आले. शिखर धवनने 97, शुभमन गिलने 64 आणि श्रेयस अय्यरने 54 रनची खेळी केली. वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोती आणि अल्झारी जोसेफ यांना 2-2 विकेट मिळाल्या, तर रोमारियो शेफर्ड आणि अकील हुसैन यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. भारताने दिलेलं 309 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजला 305 रनच करता आले, त्यामुळे भारताचा 3 रनने विजय झाला. भारताकडून मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि युझवेंद्र चहल यांना 2-2 विकेट मिळाल्या. या विजयानंतर कर्णधार शिखर धवनला प्लेयर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. धवनने 99 बॉलमध्ये 97 रन केले. सहाव्यांदा धवन नर्व्हस-90 चा शिकार झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या