JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / India vs South Africa : कसोटीचा टी-20 तडाखा! क्रिकेटच्या इतिहासात घडला नवा विश्वविक्रम

India vs South Africa : कसोटीचा टी-20 तडाखा! क्रिकेटच्या इतिहासात घडला नवा विश्वविक्रम

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यात फलंदाजांचा टी-20 अवतार पाहायला मिळाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विशाखापट्टणम, 06 ऑक्टोबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात सर्वच फलंदाजांचा टी-20 अवतार पाहायला मिळाला. या सामन्यात षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. क्रिकेटच्या इतिहासात षटाकारांचा एक विक्रम पाहायला मिळाला. एकाच सामन्यात षटकारांचे दोन विक्रम झाला. पहिल्याच सामन्यात आतापर्यंत 36 षटकार लगावले गेले. पाच वर्षांनंतर कसोटी सामन्यात असा प्रकार घडला आहे की कसोटी सामन्यात सर्वात जास्त षटकार लगावण्यात आले आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असलेल्या कसोटी सामन्यात फलंदाज डेन पीटनं रवींद्र जडेजाच्या शेवटच्या चेंडूवर 35व्या ओव्हरमध्ये 36वा षटकार लगावला, या षटकारासह एका विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. याआधी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात शारजाह येथे 2014मध्ये शारजाह येथे झालेल्या कसोटी सामन्यात सर्वात जास्त म्हणजे 35 षटकार ठोकले होते. वाचा- अरे देवा! विक्रमांचा डोंगर उभारणाऱ्या रोहितनं केला एक लाजीरवाणा विक्रम या कसोटी सामन्यात ठोकले सर्वात जास्त षटकार 36 षटकार- भारत विरुद्ध दक्षिण अफ्रीका, विखाखापट्टणम(2019) 35 षटकार - पाकिस्तान विरुद्ध न्युझीलॅंड, शारजाह(2014) 27 षटकार - पाकिस्तान विरुद्ध भारत, फैसलाबाद(2005) 27 षटकार - बांग्लादेश विरुद्ध न्युझीलॅंड, चटगॉंव(2013) वाचा- रोहित शर्मानं भरमैदानात पुजाराला घातली शिवी, चाहत्यांनी विराटवर काढला राग रोहित शर्मा ठरला षटकारांचा बादशाह रोहित शर्मा एका कसोटी सामन्यात 9 किंवा त्यापेक्षा जास्त षटकार ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठोकला आहे. रोहितनं या सामन्यात एकूण 13 षटकार लगावले. रोहितने पहिल्या डावात शतकी खेळी करताना 6 षटकार ठोकले होते. दुसऱ्या डावात 7 षटकार खेचले आहेत. यासह रोहितने सिद्धू यांच्या नावावर असलेला विक्रम मोडला. सिद्धू यांनी 1994मध्ये लखनौ कसोटीत श्रीलंकेविरुद्ध 8 षटकार ठोकले होते. तसेच, याआधी पाकिस्तानच्या वसीम अक्रमनं एका कसोटी सामन्यात 12 षटकार ठोकले होते. याचसोबत कसोटी, टी-20 आणि वन-डे अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावे जमा झाला आहे. वाचा- VIDEO : ‘रोहित नावापुढे G लाव’, अख्तरने का दिला होता असा सल्ला? VIDEO : माकडाने पाडला पैशांचा पाऊस, पैसे घेण्यासाठी लोकांची गर्दी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या