इंदूर, 15 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यात होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मयंक अग्रवाल शानदार कामगिरी करत आहे. इंदूरमध्ये होत असलेल्या सामन्यात कसोटी सामन्यात 183 चेंडूत शतकी कामगिरी केली. 15 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं मयंकनं शतक पूर्ण केले. मयंकचे हे तिसरे शतक आहे. ऑस्ट्रेलिया विरोधात ऑस्ट्रेलियामध्येच पदार्पण केलेल्या मयंकनं दक्षिण आफ्रिका विरोधात तुफानी फलंदाजी करत संघात जागा कायम ठेवली. पदार्पणानंतर मयंकनं नॉनस्टॉप कामगिरी केली आहे. बांगलादेश विरोधात शतकी कामगिरी करत मयंकनं सध्याच्या घडीला टॉपवर असलेल्या खेळाडूला मागे टाकले आहे. मयंकनं 55.19च्या सरासरीनं आपले शतक पूर्ण केले.
वाचा- विराटचा नको असलेला विक्रम, दोन वर्षांनी आली ही वेळ बांगलादेश विरोधात शतकी कामगिरी करत मयंकनं ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथला मागे टाकले आहे. कसोटीमध्ये स्मिथची सरासरी 64.5 आहे तर मयंकनं 65च्या सरीसरीनं धावा केल्या आहेत. क्रिकेट जगतात सध्या विराट आणि स्मिथ हे दोघे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. या दोघांमध्ये सतत स्पर्धा रंगलेली असते. आयसीसी रॅकिंगमध्येही स्मिथ पहिल्या तर विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळं विराटच्याआधी मयंकने स्मिथला सरासरीमध्ये मागे टाकले आहे.
वाचा- इंदूरमध्ये झाली टीम इंडियाची पोलखोल, विराट-रहाणे पडले उघडे दक्षिण आफ्रिका विरोधात केले होते पहिले शतक सलामीचा फलंदाज मयंक अग्रवाल आपला पाचवा कसोटी सामना खेळत आहे. याच एक द्विशतकाचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिका विरोधात मयंकनं ही कामगिरी केली होती. त्यानं विशाखापटण्णममध्ये 215 धावांची खेळी केली होती. त्यानंतर पुढच्या कसोटी सामन्यात 108 धावा केल्या. वाचा- अश्विननं भिंगरीसारखा फिरवला चेंडू! फलंदाज बघत बसला अन् गेली विकेट, पाहा VIDEO ऑस्ट्रेलियामध्ये केले होते पदार्पण 28 वर्षीय मयंक अग्रवालनं ऑस्ट्रेलियाविरोधात एमसीजे येथे पदार्पण केले होते. या सामन्यात त्यानं 76 धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात 42 धावा केल्या होत्या. या कसोटी सामन्यात भारतानं 137 धावांनी विजय मिळवला होता. पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरीकरत मयंकनं संघात जागा मिळवली. त्यानंतर कसोटीमध्ये सलामीची जागा मिळवत मयंकनं शतकी खेळी करण्यात सुरुवात केली आहे.