JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SA : वन डे सीरिजसाठी टीम इंडिया सज्ज, कुठे पाहाल Live Streaming

IND vs SA : वन डे सीरिजसाठी टीम इंडिया सज्ज, कुठे पाहाल Live Streaming

भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (IND vs SA) तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळली जाणार. आता एकदिवसीय मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

जाहिरात

Team India

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 18 जानेवारी: दक्षिण अफ्रिकेविरुद्ध (South Africa Vs India) टेस्ट सिरिज संपल्यानंतर आता टीम इंडिया (Team India) ने वन डे सीरिजसाठी तयारी सुरू केली आहे. कॅप्टन के एल राहुल (New caption Team India KL Rahul) याच्या नेतृत्वाखाली टिम इंडिया 3 सामन्यांची वन डे सीरिज जिंकण्याचा प्रयत्न करेल. वन डेच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर ही पहिलीच सीरिज असल्यानं विराट कोहलीसाठी ही सीरिज विशेष असेल. येत्या 19 जानेवारी रोजी भारताच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत तब्बल तीन वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा केलाय. यापूर्वी, भारतानं 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. विशेष म्हणजे, विराट कोहली पहिल्यांदाच एमएस धोनीशिवाय दुसऱ्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली मैदानावर खेळताना दिसणार आहे.

भारतीय संघ- के. एल. राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), यजुवेंद्र चहल, आर. अश्विन, जयंत यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली वनडे मॅच कधी खेळवण्यात येणार? भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता खेळवला जाईल. टॉस दुपारी 1.30 वाजता होईल. कुठे खेळवण्यात येणार? पहिला एकदिवसीय सामना बोलंड पार्क, पार्ल येथे खेळवण्यात येणार आहे. लाईव्ह प्रसारण कुठे पाहता येणार? भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याचं लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे दिसणार? या मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही पाहता येईल. दक्षिण आफ्रिका संघ- टेम्बा बावुमा (कर्णधार), केशव महाराज (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक, झुबेर हमजा, मार्को जॅन्सेन, जानेमन मालन, सिसांडा मगला, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, वेन पारनेल, एंडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, कागिडा , तबरेझ शम्सी , रासी व्हॅन डर डुसेन आणि काइल व्हर्न.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या