मुंबई, 1 जून : क्रिकेट वेस्ट इंडिजने टीम इंडियाच्या दौऱ्याचा (India vs West Indies) कार्यक्रम घोषित केला आहे. जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये भारतीय टीम वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे, यात 3 वनडे आणि 5 टी-20 मॅच खेळवल्या जाणार आहेत, त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कपची (T20 World Cup) तयारी करण्याची चांगली संधी उपलब्ध आहे. आयपीएल संपल्यानंतर आता भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये 5 टी-20 मॅचच्या सीरिजला 9 जूनपासून सुरूवात होणार आहे. या सीरिजसाठी कोहली, रोहित आणि बुमराह या सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, यानंतर टीम इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरूवात वनडे सीरिजने होणार आहे. पहिला सामना 22 जुलैला त्रिनिदादमध्ये होईल, तर अखेरची मॅच 7 ऑगस्टला फ्लोरिडामध्ये खेळवली जाणार आहे. टी-20 सीरिजच्या अखेरच्या दोन मॅच अमेरिकेच्या फ्लोरिडामध्येच होणार आहेत. टी-20 वर्ल्ड कप 2024 चं आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे, त्यामुळे इकडे सामने खेळवले जाणार आहेत. याआधीही दोन्ही देशांमध्ये अमेरिकेत सामने झाले आहेत. टी-20 मध्ये भारताचं रेकॉर्ड चांगलं टीम इंडियाचं टी-20 क्रिकेटमधलं वेस्ट इंडिजविरुद्धचं रेकॉर्ड चांगलं आहे. दोन्ही टीममध्ये आतापर्यंत 20 मॅच झाल्या यातल्या 13 मॅच भारताने जिंकल्या, म्हणजेच भारताची विजयी टक्केवारी 75 टक्के एवढी आहे. तर वेस्ट इंडिजने 6 मॅचमध्ये भारताचा पराभव केला आणि एका मॅचचा निकाल लागू शकला नाही. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत 136 वनडे झाल्या, यातल्या 67 सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला तर 63 मॅचमध्ये वेस्ट इंडिज जिंकली. 2 मॅच टाय झाल्या आणि 4 मॅचचा निकाल लागला नाही. भारताचा वेस्ट इंडिज दौरा पहिली वनडे, 22 जुलै, त्रिनिदाद दुसरी वनडे, 24 जुलै, त्रिनिदाद तिसरी वनडे, 27 जुलै, त्रिनिदाद पहिली टी-20, 29 जुलै, त्रिनिदाद दुसरी टी-20, 1 ऑगस्ट, सेंट किट्स तिसरी टी-20, 2 ऑगस्ट, सेंट किट्स चौथी टी-20, 6 ऑगस्ट, फ्लोरिडा पाचवी टी-20, 7 ऑगस्ट, फ्लोरिडा