JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SL : मग टीममध्ये घेतलंच कशाला? रोहितने न खेळवताच या खेळाडूला केलं बाहेर

IND vs SL : मग टीममध्ये घेतलंच कशाला? रोहितने न खेळवताच या खेळाडूला केलं बाहेर

भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्टआधी (India vs Sri Lanka 2nd Test) टीम इंडियात मोठा बदल करण्यात आला आहे. बँगलोरमध्ये होणाऱ्या डे-नाईट टेस्टसाठी ऑलराऊंडर अक्षर पटेलचं (Axar Patel) टीम इंडियात पुनरागमन झालं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बँगलोर, 8 मार्च : भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्टआधी (India vs Sri Lanka 2nd Test) टीम इंडियात मोठा बदल करण्यात आला आहे. बँगलोरमध्ये होणाऱ्या डे-नाईट टेस्टसाठी ऑलराऊंडर अक्षर पटेलचं (Axar Patel) टीम इंडियात पुनरागमन झालं आहे. 12 मार्चपासून या टेस्ट मॅचला सुरूवात होणार आहे. अक्षर पटेलच्या आगमनानंतर डावखुरा स्पिनर कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) टीममधून बाहेर करण्यात आलं आहे. कुलदीप यादवला एकही संधी न देताच टीममधून बाहेर करण्यात आलं, मग त्याला टीममध्ये घेतलंच कशाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अक्षर पूर्णपणे फिट नसल्यामुळे तो पहिली टेस्ट खेळू शकला नव्हता. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार अक्षर मोहाली टेस्टदरम्यानच रविवारी 6 मार्चला भारतीय टीममध्ये दाखल झाला होता. मोहाली टेस्टमध्ये कुलदीप यादवला अक्षरचा बॅकअप म्हणून टीममध्ये घेण्यात आलं होतं. टीमला 3 डावखुऱ्या स्पिनर्सची गरज नाही, तसंच रवींद्र जडेजाही टीममध्ये आहे. शिवाय सौरभ कुमार आणि अक्षर पटेलही आहेत. अश्विन आणि जयंत यादवही स्पिन बॉलिंग टाकतात. स्पिन बॉलिंगचे एवढे पर्याय उपलब्ध असल्यामुळे कुलदीपला बाहेर करण्यात आलं आहे. 22 फेब्रुवारीला बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्ध 2 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी टीमची घोषणा केली होती. तेव्हा बोर्डाने अक्षरचं रिहॅब सुरू आहे त्यामुळे तो निवडीसाठी उपलब्ध नाही. दुसऱ्या टेस्टच्या निवडीसाठी त्याचा तपास केला जाईल, असं सांगितलं. अक्षर पटेलने अखेरची टेस्ट डिसेंबर महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळली होती. यानंतर तो दुखापतीमुळे टीम बाहेर झाला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही त्याला जाता आलं नाही. आता अक्षर पूर्णपणे फिट आहे आणि बँगलोर टेस्टमध्ये जयंत यादवऐवजी अक्षरला प्लेयिंग XI मध्ये संधी मिळू शकते. अक्षर पटेलचं डे-नाईट टेस्टमधलं रेकॉर्ड उल्लेखनीय आहे. अक्षरने आतापर्यंत एक डे-नाईट टेस्ट खेळली यात त्याने तब्बल 11 विकेट घेतल्या. मागच्या वर्षी इंग्लंडविरुद्ध आपल्या घरच्या मैदानात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अक्षर पटेल पिंक बॉल टेस्ट खेळला होता. तेव्हा त्याने पहिल्या इनिंगमध्ये 6/38 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 5/32 अशी कामगिरी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या