JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Virat Kohli : विराट कोहलीच्या डेडिकेशनला सलाम! आऊट झाल्यानंतर काय केलं? पाहा Photo

Virat Kohli : विराट कोहलीच्या डेडिकेशनला सलाम! आऊट झाल्यानंतर काय केलं? पाहा Photo

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये विराट कोहली एक रनवर आऊट झाला, पण तरीही विराट कोहलीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 डिसेंबर : विराट कोहलीने करियरमधल्या तीन वर्षांच्या दुष्काळानंतर पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलं आहे. नोव्हेंबर 2019 ते सप्टेंबर 2022 पर्यंत विराट कोहलीला एकही शतक करता आलं नव्हतं. यानंतर आशिया कप 2022 मध्ये विराटने अफगाणिस्तानविरुद्ध शतक ठोकलं, याचसोबत त्याचा शतकांचा दुष्काळही संपला. टी-20 फॉरमॅटमधलं विराटचं हे पहिलंच शतक होतं. यानंतर 10 डिसेंबरला विराटने बांगलादेशविरुद्ध वनडेमध्ये 113 रनची खेळी करून वर्षातलं आणखी एक शतक ठोकलं. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्येही चाहत्यांना विराटकडून शतकाची अपेक्षा होती, पण पहिल्याच दिवशी विराट एक रन करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 5 बॉलमध्ये 1 रन करून आऊट झाल्यानंतर विराटला टीकेचा सामनाही करावा लागला, पण आऊट झाल्यावर विराटने जे केलं त्यानंतर सोशल मीडियावर त्याचं कौतुक होत आहे. विराट आऊट झाला तेव्हा भारताचा स्कोअर 48/3 एवढा होता. पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर विराट कोहली शांत बसला नाही, तर टी ब्रेकवेळी तो प्रॅक्टिस करताना दिसला. चटगांवच्या जहूर अहमद चौधरी स्टेडियममध्ये मॅच सुरू होती तेव्हा विराट या अपयशातून बाहेर येण्यासाठी नेटमध्ये सराव करत होता. विराट कोहलीचं हे डेडिकेशन बघून त्याचं कौतुक होत आहे.

टेस्ट क्रिकेटमध्ये विराटचं शेवटचं शतक 2019 साली बांगलादेशविरुद्धच इडन गार्डनमध्ये झालं होतं, त्यानंतर 33 इनिंगमध्ये विराटला फक्त 6 अर्धशतकं करण्यात आली आहे, यात त्याची सरासरीही फक्त 26.45 एवढीच आहे. या सामन्यात विराट तैजुल इस्लामच्या बॉलिंगवर आऊट झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या