JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND VS AUS : टीम इंडियाच्या प्लेयिंग 11 मधून सूर्यकुमार, अक्षर पटेल बाहेर!

IND VS AUS : टीम इंडियाच्या प्लेयिंग 11 मधून सूर्यकुमार, अक्षर पटेल बाहेर!

भारताचा स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादव बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. परंतु ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारताच्या माजी क्रिकेटपटूने त्याला भारताच्या प्लेयिंग 11 मध्ये सहभागी केले नाही.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 जानेवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला शुक्रवार 9 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हा नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार असून याकरता भारतीय संघ नागपुरात दाखल झाला आहे. भारताचा स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादव  बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. परंतु ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारताच्या माजी क्रिकेटपटूने त्याला भारताच्या प्लेयिंग 11 मध्ये सहभागी केले नाही. भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वसीम जाफर याने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताची प्लेयिंग 11 निवडली आहे. यात वसीम जाफरने कर्णधार रोहित शर्माला सलामीचा फलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले असून त्याच्या जोडीला सलामीसाठी के एल राहुलची निवड केली आहे. जाफरने तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा याला स्थान दिले असून चौथ्या क्रमांकासाठी विराट कोहलीची निवड केली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात जाफरने सध्या फॉर्मात असलेल्या युवा स्टार फलंदाज शुभमन गिलला पाचव्या स्थानी संधी दिली आहे. तर यष्टीरक्षक असलेल्या केएस भरतला सहाव्या क्रमांकावर ठेवले आहे. तर दुखापतीतून सावरत भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जडेजाला त्याने सातव्या क्रमांकावर निवडले आहे. हे ही वाचा: विराट, धोनीनंतर हा भारतीय क्रिकेटर करतोय आध्यात्मिक यात्रा नागपूर येथील खेळपट्ट्या ह्या भारताच्या फिरकीपटूंसाठी अनुकूल असल्याने त्याने रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादव या दोघांचाही प्लेयिंग 11  मध्ये समावेश केला आहे. तर वेगवान गोलंदाज म्हणून त्याने मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या दोघांना संधी दिली आहे.

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे वसीम जाफरने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अक्षर पटेल, इशान किशन, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव आणि उमेश यादव यांना संधी दिली नाही. ही प्लेयिंग 11 माजी क्रिकेटर वसीम जाफर याने ठरवली असली. तरी 9 फेब्रुवारी पासून होणाऱ्या पहिल्या कसोटी मालिकेसाठी भारताची प्लेयिंग 11 कशी असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकतात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या