JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ICC Women's World Cup: पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारूफने ऐतिहासिक विजयाचे छोट्या परीसोबत केले सेलिब्रेशन, VIDEO

ICC Women's World Cup: पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारूफने ऐतिहासिक विजयाचे छोट्या परीसोबत केले सेलिब्रेशन, VIDEO

महिला विश्वचषक 2022 चे सामने सुरूच आहेत. उपांत्य फेरी गाठण्यासाठी सर्वच संघ जोरदार प्रयत्न करत आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाने (Pakistan Women’s Cricket Team) अखेर पहिला विजय नोंदवला आहे. पाकिस्तान महिलांनी वेस्ट इंडिजचा (West Indies) 8 विकेटने धुव्वा उडवून विश्वचषकात सुरु आपली 18 सामन्यांची पराभवाची मालिका खंडित केली. या विजायानंतर पाकिस्तान संघाची कर्णधार बिस्माह मारूफच्या(Bismah Maroof) चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला.

जाहिरात

ICC Women's World Cup

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 मार्च: महिला विश्वचषक 2022 चे सामने सुरूच आहेत. उपांत्य फेरी गाठण्यासाठी सर्वच संघ जोरदार प्रयत्न करत आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाने (Pakistan Women’s Cricket Team) अखेर पहिला विजय नोंदवला आहे. पाकिस्तान महिलांनी वेस्ट इंडिजचा (West Indies) 8 विकेटने धुव्वा उडवून विश्वचषकात सुरु आपली 18 सामन्यांची पराभवाची मालिका खंडित केली. या विजायानंतर पाकिस्तान संघाची कर्णधार बिस्माह मारूफच्या(Bismah Maroof) चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. तिने या विजयाचे सेलिब्रेशन आपली 7 महिन्याची नन्ही परीसोबत केले ज्याच्या व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. अनुभवी ऑफ-स्पिनर निदा दारची (Nida Dar) धडाकेबाज गोलंदाजी आणि सलामीवीर मुनिबा अली (Muneeba Ali) हिच्या खेळीमुळे पाकिस्तानने (Pakistan) आयसीसी महिला विश्वचषक (ICC Women’s World Cup) स्पर्धेत सलग 18 पराभवानंतर पहिला विजय नोंदवला आणि पावसाने बाधित सामन्यात वेस्ट इंडिज महिलांचा एकतर्फी सामन्यात पराभव केला.

या विजायानंतर पाकिस्तान संघाची कर्णधार बिस्माह मारूफच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. ती आनंदाने आपल्या मुलीला हवेत खेळवताना दिसली. तिच्या या नन्हा परीचे नाव फतिमा असून आयसीसीने या मायलेकींचा व्हिडीओ आपल्या अधिकृत सोशल अकाऊंट्सवर शेअर केला आहे.

संबंधित बातम्या

आई-मुलीच्या या क्यूट व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. बिस्माच्या स्तुतीसाठी चाहते वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. बिस्मान हा तीच खेळाडू आहे जिने गरोदरपणात क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. पती आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या पाठिंब्यामुळे तिला नंतर निवृत्तीचा निर्णय बदलावा लागला. ऑस्ट्रेलिया महिला संघ सर्व 5 सामने जिंकून गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका संघाने आतापर्यंत सर्व 4 सामने जिंकले आहेत. तसेच वेस्ट इंडिजच्या पराभवानंतर पॉइंट टेबल पूर्णपणे उघडले आहे. विंडीजने 6 पैकी 3 सामने जिंकले असून त्यांचे 6 गुण आहेत. विंडीज संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे, पण इथे खेळ असा आहे की आता वेस्ट इंडिजचा एक सामना बाकी आहे. IPL2022: ‘ती परत येतेय’…2 वर्षांनी पुन्हा क्रिकेटच्या मैदानात दिसणार विंडीज महिलांच्या पराभवामुळे भारत आणि इंग्लंड संघहच मार्ग मोकळा झाला आहे. या दोन्ही संघाचे प्रत्येकी दोन सामने शिल्लक असून जर या दोघांनी आपले दोन्ही सामने जिंकले आणि विंडीजने आपला सामना जिंकला तर तिघांचेही 8 गुण होतील. आणि नेट रनरेटच्या आधारे निर्णय घेतला जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या