JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Women's World Cup : शेवटच्या ओव्हरमध्ये ड्रामा, यजमान टीमला पराभवाचा धक्का!

Women's World Cup : शेवटच्या ओव्हरमध्ये ड्रामा, यजमान टीमला पराभवाचा धक्का!

आयसीसी महिला वर्ल्ड कप (Women’s World Cup 2022) स्पर्धेची सुरूवात जोरदार झाली आहे. न्यूझीलंड विरूद्ध वेस्ट इंडिज (NZ vs WI) यांच्यात झालेली स्पर्धेतील पहिली मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगतदार झाली.

जाहिरात

फोटो - @ICC

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 मार्च : आयसीसी महिला वर्ल्ड कप (Women’s World Cup 2022) स्पर्धेची सुरूवात जोरदार झाली आहे. न्यूझीलंड विरूद्ध वेस्ट इंडिज (NZ vs WI) यांच्यात झालेली स्पर्धेतील पहिली मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगतदार झाली. शेवटच्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडला मॅच जिंकण्यासाठी 6 रनची आवश्यकता होती. त्यांच्या 3 विकेट्स शिल्लक असल्यानं यजमान टीमचं पारडं जड होतं, पण वेस्ट इंडिजनं त्यांना धक्का देत 3रननं विजय मिळवला. वेस्ट इंडिजच्या डियांड्रा टॉटीननं शेवटच्या ओव्हरमध्ये मॅचचं चित्र बदललं. तिने पाच बॉलमध्ये दोन विकेट घेतल्या तसंच एकीला रन आऊट केले. त्यामुळे वेस्ट इंडिजनं विजयानं या स्पर्धेची सुरूवात केली. विशेष म्हणजे डॉटीननं या मॅचमध्ये एकच ओव्हर टाकली. या ओव्हरमध्ये तिने टीमला थरारक विजय मिळवून दिला.

संबंधित बातम्या

वेस्ट इंडिजची हॅली मॅथ्यूज ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्काराची मानकरी ठरली. मॅथ्यूजनं शतक झळकावत 119 रनची खेळी केली. यजमान न्यूझीलंडनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजनं निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 आऊट 259 रन केले. मॅथ्यूजसह शेडियन नेशनलनं 36 तर कॅप्टन स्टेफनी टेलरनं 30 रन केले. न्यूझीलंडकडून कॅप्टन सोफी डिवाईननं शतक झळकावलं. तिने 108 रन केले. केट मार्टिननं 44 तर जेस केरनं 25 रन काढले. IPL 2022 : धोनीनं भर रस्त्यात थांबवली बस, ट्रॅफिक पोलिसांना म्हणाला….VIDEO एमी सदरवेटनं 31 रनची खेळी केली. न्यूझीलंडला शेवटच्या दोन ओव्हरमध्ये विजयासाठी 20 रन हवे होते. त्यांनी 49 व्या ओव्हरमध्ये 14 रन करत विजय जवळ आणला होता. पण, डियांड्राच्या एका ओव्हरनं मॅचंचं संपूर्ण चित्र बदललं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या