JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / चक दे इंडिया! आजपासून हॉकी वर्ल्ड कपला सुरुवात; भारत आणि स्पेन भिडणार

चक दे इंडिया! आजपासून हॉकी वर्ल्ड कपला सुरुवात; भारत आणि स्पेन भिडणार

ऑलिम्पिकमध्ये 8 सुवर्णपदकं जिंकणाऱ्या भारताने 1975 मध्ये एकमेव वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर आतापर्यंत भारताला सेमीफायनलमध्येही पोहोचता आलेलं नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

**भुवनेश्वर, 12 जानेवारी :**आजपासून हॉकी वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. भारतीय संघ शुक्रवारी 13 जानेवारीला वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना स्पेनविरुद्ध होणार आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीत प्रो लीग सामन्यात स्पेनने पहिला सामना 5-3 ने जिंकला होता तर भारताने दुसऱ्या सामन्यात 5-4 ने विजय मिळवला होता. तर भारताच्या हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलं होतं. भारताने 1948 पासून आतापर्यंत स्पेनविरुद्ध 30 पैकी 13 सामने जिंकले आहेत. तर स्पेनने 11 सामने जिंकले असून सहा अनिर्णित राहिले आहेत. 2020 च्या ऑलिम्पिकमध्ये भारताने स्पेनवर 3-0 ने विजय मिळवला होता. ऑलिम्पिकमध्ये 8 सुवर्णपदकं जिंकणाऱ्या भारताने 1975 मध्ये एकमेव वर्ल्ड कप जिंकला होता. क्वाललांपूरमध्ये अजितपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली भारताने ही कामगिरी केली होती. त्यानंतर आतापर्यंत भारताला सेमीफायनलमध्येही पोहोचता आलेलं नाही. हेही वाचा :  2 हजारहून अधिक काडीपेटी, ओडिशाच्या मुलानं तयार केली हॉकी वर्ल्ड कपची प्रतिकृती! याआधी 1971 मध्ये ब्रॉन्झ मेडल तर 1973 मध्ये सिल्वर मेडल जिंकलं होतं. यानंतर 1978 पासून 2014 पर्यंत भारत गट फेरीच्या पुढे मजल मारू शकलेला नाही. तर गेल्या वेळीही भुवनेश्वरमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये भारत क्वार्टर फायनलमध्ये नेदरलँडविरुद्ध पराभूत झाला होता. हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली यंदा भारत मायदेशात मेडलच्या दावेदारांपैकी एक आहे. जागतिक क्रमवारीत भारत सहाव्या स्थानी असून एफआयएच प्रो लीगमध्ये भारताने तिसरं स्थान पटकावलं होतं. रीड यांच्याकडे प्रशिक्षकाची धुरा सोपवल्यानतंर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय हॉकीची मान आणखी उंचावली आहे. रीड यांनी खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेतलीय. तर भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंह हा जगातील सर्वोत्तम ड्रॅग फ्लिकरपैकी एक आहे. हेही वाचा :  हॉकी वर्ल्ड कपच्या उदघाटन सोहळ्यात अवतरणार बॉलिवूड; रणवीर सिंह, दिशा पटानी दाखवणारं डान्सचा जलवा सामना कुठे आणि कधी पाहता येणार? भारत आणि स्पेन यांच्यातील सामना १३ जानेवारीला होणार आहे. राउरकेलातील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियममध्ये सामना होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ७ वाजता सामना सुरू होणार आहे. स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 2 आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 2 एचडी यावरून थेट प्रक्षेपण होणार आहे. याशिवाय डिजनी हॉटस्टार आणि वॉच हॉकी अॅप किंवा वेबसाइट यावरही सामने पाहता येणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या