JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / हार्दिक पांड्याची घसरली जीभ, वेळेत पाणी न मिळाल्याने दिली शिवी

हार्दिक पांड्याची घसरली जीभ, वेळेत पाणी न मिळाल्याने दिली शिवी

भारताची गोलंदाजी सुरू असताना ११ व्या षटकाच्या अखेरीस हार्दिक पांड्या शिवी देत असताना रेकॉर्ड झालं आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोलकाता, 12 जानेवारी : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना कोलकात्यातील इडन गार्डन्सवर झाला. यात भारताने ४ गडी राखून विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यावेळी भारताचा उपकर्णधार हार्दिक पांड्या अपशब्द बोलताना दिसला. स्टम्प माइकमध्ये हार्दिक पांड्याचा आवाज रेकॉर्ड झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हार्दिक पांड्या डगआऊटमध्ये बसलेल्या खेळाडूवर नाराज असल्याचं दिसून आला. पाणी मागितल्यानंतरही त्याला पाणी न मिळाल्यानं तो चिडला होता. भारताची गोलंदाजी सुरू असताना ११ व्या षटकाच्या अखेरीस हार्दिक पांड्या शिवी देत असताना रेकॉर्ड झालं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत हार्दिक पांड्याने म्हटलं की, “पाणी मागितलं होतं शेवटच्या ओव्हरमध्ये.” तिकडे काय करत होतास असं विचारताना पांड्याने अपशब्द वापरले. सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांनी हार्दिक पांड्याचा आवाज ऐकला. त्यानंतर व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हेही वाचा :  भारताने सामन्यासह मालिका जिंकली, केएल राहुलच्या संयमी खेळीने तारले भारताच्या कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांच्या गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेला २१५ धावांत गुंडाळले. श्रीलंकेचा संघ ४० षटकेच खेळू शकला. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताची अवस्था बिकट झाली होती. ४ बाद ८६ वरून केएल राहुलने संयमी खेळी करत सुरुवातीला हार्दिक पांड्यासोबत त्यानंतर अक्षर पटेलसोबत महत्त्वाची भागिदारी केली. तसंच अखेरपर्यंत मैदानावर टिकून राहत संघाला विजय मिळवून दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या