JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / मद्यपान केलेल्या MIच्या खेळाडूने मला 15 व्या मजल्यावरून सोडले अन्...Yuzvendra Chahal ने शेअर केला 'तो' भयंकर किस्सा

मद्यपान केलेल्या MIच्या खेळाडूने मला 15 व्या मजल्यावरून सोडले अन्...Yuzvendra Chahal ने शेअर केला 'तो' भयंकर किस्सा

आरसीबीविरुद्ध (RCB) खेळवण्यात आलेल्या मॅचमध्ये विराट कोहलीली आऊट केल्यानंतर हिशोब चुकता केला. अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली असतानाच उतरलेला युझवेंद्र चहलने(Yuzvendra Chahal) त्याच्यासोबत घडलेला एक भयानक अनुभव शेअर केला आहे.

जाहिरात

Yuzvendra Chahal

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 एप्रिल: यंदाच्या आयपीएल 15 व्या (IPL 2022) सीझनमध्ये राजस्थान रॉयल्सकडून उतरलेला युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने आरसीबीविरुद्ध (RCB) खेळवण्यात आलेल्या मॅचमध्ये विराट कोहलीली आऊट केल्यानंतर हिशोब चुकता केला. अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली असतानाच चहलने त्याच्यासोबत घडलेला एक भयानक अनुभव शेअर केला आहे. 2013 मध्ये मरता मरात वाचलो असल्याचे चहलने यावेळी म्हटले आहे. राजस्थान रॉयल्सने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो अश्विनसोबत मनसोक्त संवाद साधताना दिसला. यावेळी त्याने मुंबई इंडियन्ससोबत असताना घडलेला एक किस्सा शेअर केला आहे. 2013 मध्ये मॅचनंतर बंगळुरू येथे मुंबई इंडियन्सचे काही खेळाडू भरपूर प्यायले होते आणि ते त्याला घेऊन 15 व्या मजल्यावर गेले. IPL 2022, DC vs LSG : मॅच दरम्यान घडली भयंकर घटना, भर मैदानात कळवळला Prithvi Shaw हॉटेलच्या 15 व्या मजल्यावरून मुंबईच्या खेळाडूने मला सोडले असते किंवा जर त्याची माझ्या मानेवरील पकड सुटली असती तर मी सरळ खाली पडलो असतो. नशिबाने तेथे अन्य लोकं आले आणि मला वाचवले. मला चक्कर आली आणि लोकांनी मला पाणी दिले.

संबंधित बातम्या

मला वाटले की मी थोडक्यात वाचलो. जर मद्यधुंद खेळाडूने चूक केली असती तर मी 15 मजल्यावरून खाली पडलो असतो. अशी भावना त्याने यावेळी व्यक्त केली. आयपीएलमध्ये पदार्पणादरम्यान, चहल मुंबई इंडियन्सकडून खेळला. 2013ते 2021 पर्यंत तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला. यंदाच्या पर्वात राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या चहलच्या नावावर आयपीएलमध्ये 119 सामन्यांत 139 विकेट्स आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या